IMPIMP

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

by nagesh
LIC Jeevan Anand Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) पॉलिसी देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध श्रेणींसाठी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Alert | सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीने (life insurance corporation of india) गुरुवारी म्हटले की, ते गडबड करणार्‍या त्या संस्थांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहेत, ज्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर त्यांच्या लोगोचा अनधिकृत वापर करत आहेत. LIC ने आपल्या इशार्‍यात जनतेला अशा संस्थांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे, ज्या ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब (YouTube) सारख्या सोशल मीडिया मंचावर त्यांच्या लोगोचा दुरुपयोग करत आहेत. (LIC Alert)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

नोटिसमध्ये म्हटले आहे की, आमच्या लक्षात हे सुद्धा आले आहे की, काही अप्रामाणिक संस्था आणि एजंटने वेबसाइट आणि अ‍ॅप बनवले आहेत, ज्याद्वारे आमचा ट्रेडमार्क / सेवा चिन्हाचा (Logo) वापर करून ग्राहकांना विमा (LIC Customer ) आणि विमा सल्लागार (Insurance Consultant)

 

सेवा सारख्या विविध सेवा प्रदान करत आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, डोमेन नावाचा संभ्रम निर्माण करून ते कोणत्या तरी प्रकारे एलआयसीसोबत संबंधीत आहेत किंवा त्यांच्या द्वारे अधिकृत आहेत, असे दाखवले जात आहे.

ग्राहकांची अशी केली जात आहे दिशाभूल –
भारतीय आयुर्विमा महामंडळानुसार, अशा एजंटनी एलआयसीच्या लोगोची वेबसाइट आणि अ‍ॅप्स बनवले आहेत.
ज्यामध्ये एलआयसीसोबत मिळते-जुळते डोमेन आणि वेबसाइटचे डिझाईन आहे.
यामुळे ग्राहक एलआयसीवरील विश्वासामुळे येथे पॉलिसी खरेदी करतात. नंतर त्यांच्यासोबत फ्रॉड केला जाऊ शकतो. (LIC Alert)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवा –
लोकांना सावध केले जात आहे की, आमच्या प्रॉडक्टसंबंधी सर्व माहिती आमची वेबसाइट http://www.licindia.in वर उपलब्ध आहे.
अप्रामाणिक लोकांद्वारे उपलब्ध डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी किंवा संभ्रम निर्माण करणार्‍या माहितीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
असे बोगस प्लॅटफॉर्म आढळल्यास आम्हाला कळवा असेही एलआयसीने म्हटले आहे.

 

Web Title :- LIC Alert | life insurance corporation of india (LIC) alerted the customer do not believe by seeing the logo otherwise there big loss

 

हे देखील वाचा :

शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

WhatsApp Privacy Setting | आपल्या फोनमध्ये ताबडतोब ऑन करा WhatsApp च्या ‘या’ 5 सेटिंग, कुणीही करू शकणार नाही ‘हेरगिरी’

 

Related Posts