IMPIMP

LIC Kanyadan Policy | ‘या’ योजनेत केवळ 121 रुपये जमा करा, मुलीच्या विवाहासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे

by nagesh
LIC Kanyadan Scheme | lic kanyadan scheme invest rupees 151 daily and get rupees 31 lakh on maturity

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Kanyadan Policy | मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी लोक त्यांचा जन्म होताच चांगली इन्व्हेस्टमेंट पॉलिसी घेण्याचे प्लानिंग करतात. LIC ची एक पॉलिसीसुद्धा मुलींच्या लग्नसाठीच बनवण्यात आली आहे. या पॉलिसीचे नाव कन्यादान योजना (LIC Kanyadan Policy) आहे. या योजनेत 121 रुपये रोज या हिशेबाने सुमारे 3600 रुपये मासिक प्रीमियमवर हा प्लान मिळू शकतो. परंतु जर कुणी यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त प्रीमियम सुद्धा देत असेल तरी प्लान मिळू शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

LIC च्या या विशेष पॉलिसीमध्ये तुम्ही रोज 121 रुपयांच्या हिशेबाने जर जमा केले तर 25 वर्षात 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय जर पॉलिसी झाल्यानंतर मृत्यू झाला तर कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही आणि त्यांना दरवर्षी 1 लाख रुपये सुद्धा मिळतील. याशिवाय 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपये वेगळे मिळतील.

 

कोणत्या वयात मिळेल ही पॉलिसी
LIC Kanyadan Policy घेण्यासाठी 30 वर्ष किमान वय असावे आणि मुलीचे वय 1 वर्ष. हा प्लान 25 साठी सुद्धा मिळेल, मात्र, प्रीमियम 22 वर्षेच भरावा लागेल. परंतु, तुमच्या मुलींच्या वेगवेगळ्या वयाच्यानुसार सुद्धा ही पॉलिसी मिळते. मुलीच्या वयाच्या हिशेबाने पॉलिसीचा कालावधी कमी केला जाईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पॉलिसीवर एक नजर

25 वर्षांसाठी पॉलिसी घेता येईल.

22 वर्षांपर्यंत प्रीमियम द्यावा लागेल.

रोज 121 रुपये किंवा महीना सुमारे 3600 रुपये.

दरम्यान वीमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही.

मुलीला पॉलिसीच्या उर्वरीत वर्षात मिळणार दरवर्षी 1 लाख रुपये.

पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला 27 लाख रुपये मिळतील.

ही पॉलिसी कमी किंवा जास्त प्रीमियमची सुद्धा घेता येते.

 

Web Title :- LIC Kanyadan Policy | lic kanyadan policy invest 130 rupees daily and earn 27 lakh on maturity

 

हे देखील वाचा :

KVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका

Rain On Orchestra Bar | पोलिसांच्या छाप्यावर भरोसा कसा ठेवायचा?; ऑर्केस्ट्रा बारच्या छाप्यात 540 रुपये केले जप्त

 

Related Posts