IMPIMP

Rain On Orchestra Bar | पोलिसांच्या छाप्यावर भरोसा कसा ठेवायचा?; ऑर्केस्ट्रा बारच्या छाप्यात 540 रुपये केले जप्त

by nagesh
Rain On Orchestra Bar | raid orchestra bar cost only rs 540 how can you trust police mira road anti narcotics cell

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Rain On Orchestra Bar | मुंबईत पुन्हा एकदा छमछम ऐकू येऊ लागली आहे. वेळोवेळी हे समोरही आले आहे. पण त्यावर अंकुश ठेवणे काही सोपे नसल्याचे दिसत आहे. कारणही तसेच आहे. डान्सबारमध्ये साधारण ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण असे चित्र असते. पण मीरा रोडवरील एका ऑर्केस्ट्रा बार पोलिसांनी छापा (Rain On Orchestra Bar) टाकला त्यावेळी तेथे वेगळेच चित्र होते. या कारवाईत बार कर्मचारी व बारबालांसह १५ जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांना २० रुपयांच्या २७ नोटा म्हणजे ५४० रुपयांची रक्कम जप्त. त्यामुळे आता पोलिसांच्या या धाडीवर भरोसा कसा ठेवायचा असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. आश्चर्य म्हणजे संशयितांवर जुजबी कलमे लावल्याचेही आरोप पोलिसांवर होऊ लागले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मीरा रोडच्या शीतलनगरमधील यश ९ या ऑर्केस्ट्रा बारवर २९ नोव्हेंबरच्या रात्री अमली पदार्थविरोधी कक्षाचे (anti narcotics cell) पोलीस निरीक्षक
देविदास हंडोरे (Police Inspector Devidas Handore) यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे (API Tejshree
Shinde), सहायक निरीक्षक कुटे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी त्यांना मंद प्रकाशात चार महिला तोकडे कपडे घालून गाण्याच्या तालावर
अश्लील हावभाव करून मद्यपान करीत असलेल्या पुरुषांना उत्तेजित करीत होत्या. तर बारच्या गल्ल्याची झडती घेता, त्यात २० रुपये किंमतीच्या २७
नोटा असे ५४० रुपये मिळून आले.

 

पोलिसांनी अश्लील नाच करणाऱ्या बारबाला, एक व्यवस्थापक, एक रोखपाल, सहा वेटर आणि तीन पुरुष गायक-वादक अशा १५ जणांना ताब्यात (Rain On Orchestra Bar) घेतले. याबाबत तेजश्री यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये असा उल्लेख केला आहे. याप्रकरणात १७ जणांना आरोपी केले मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आदी कायद्याची कलमे न लावता जुजबी कलमे लावल्याचे समोर आले आहे. नावाजलेल्या मोठ्या ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ ५४० रुपयेच पोलिसांना सापडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकूणच या कारवाईवर नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Rain On Orchestra Bar | raid orchestra bar cost only rs 540 how can you trust police mira road anti narcotics cell

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

Shirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू?, राज्यात अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्या

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

 

Related Posts