IMPIMP

Maharashtra Assembly Winter Session | मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो ! शिवसेना नेते दिवाकर रावतेंच्या घोषणाबाजीनंतर अजित पवारांची सुचना; म्हणाले…

by nagesh
Maharashtra Assembly Winter Session | maharashtra assembly winter session deputy cm ajit pawar corrects shiv sena mla divakar rawte

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Assembly Winter Session | आज विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू झाले आहे. आजच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे दिसले. शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केल्याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानतर जाधवांनी माफी मागितली. अशा अनेक मुद्यावरुन आज सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याचबरोबर सभागृहात कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना यावरूनही चर्चा झाली. तसेच, बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेले अत्याचार यावरून देखील विधिमंडळातलं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. या दरम्यान, विधानसभेत पुढे बसलेले मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कर्नाटक सरकारचा निषेध करत होते. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि त्याला तिथले मुख्यमंत्री क्षुल्लक घटना म्हणतात, असं शिंदे यांनी म्हटलं. तेवढ्यात शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते (Divakar Ravate) यांनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, असं म्हणत घोषणा सुरु केली.

यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागे वळून पाहिलं.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणा, अशी सूचना केली. त्यानंतर दिवाकर रावते यांना त्यांची चूक लक्षात आली.
‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो’, परत अशी घोषणा दिवाकर रावते यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Maharashtra Assembly Winter Session | maharashtra assembly winter session deputy cm ajit pawar corrects shiv sena mla divakar rawte

 

हे देखील वाचा :

Income Tax Returns | 4 कोटी लोकांनी जमा केला IT रिटर्न, ‘ही’ आहे ITR फायलिंगची शेवटची तारीख; जाणून घ्या उशीर केल्यास किती लागेल दंड

PM Kisan Yojana Date | ठरलं ! पीएम किसानचे 2 हजार रुपये ‘या’ तारखेला येणार, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती

Chandrakant Patil | ‘राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts