IMPIMP

Maharashtra Political News | ‘शरद पवार म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण…’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; दाव्यावर भाजपची खोचक टीका

by nagesh
Maharashtra Political News | bjp ashish shelar mocks sanjay raut claim on sharad pawar ncp pressure on family

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद
पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay
Raut) हे उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपसोबत (BJP) जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला
जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र, राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी
उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा राऊतांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून शरद पवारांचा (Maharashtra Political
News) नेमका रोख अजित पवारांच्या (Ajit Pawar) दिशेने तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी सामनातील आजच्या
रोखठोकमधून हा खळबळजनक दावा केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊतांना काय केला दावा?
संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा एक संदर्भ दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत (Maharashtra Political News) निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही.

 

महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकार बद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले. ईडीच्या (ED) दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकवण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्यावर टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण ईडी-सीबीआयच्या (CBI) फाईली कधीच बंद होत नाहीत, असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

 

 

जो मदत करेल त्याचे स्वागतच
संजय राऊतांच्या या दाव्यावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांच्या पक्षाबद्दल काय म्हणायचंय याची प्रतिक्रिया संजय राऊत देत आहेत. त्याला महत्त्व किती द्यायचं. त्याची किंमत काय? राजकारण राजकारणाच्या जागी असेल. सरकार भक्कमपणे काम करत आहे. आम्हाला कुणीही समर्थन दिलं तर स्वागतच आहे. आम्हाला जो मदत करेल, त्याचं स्वागतच आहे, असं शेलार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | bjp ashish shelar mocks sanjay raut claim on sharad pawar ncp pressure on family

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-विमाननगर क्राईम न्यूज : हॉटेल व्यावसायिकाकडे 25 हजाराच्या खंडणीची मागणी, एकाला अटक

Pune AAP On CBI Summon To Kejriwal | अरविंद केजरीवालांना सीबीआयने दिलेल्या नोटिस विरोधात, मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आपचा राज्यभर सत्याग्रह; पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळी फीत बांधून निषेध

 

Related Posts