IMPIMP

Maharashtra Politics News | ‘ते काहीही बोलू शकतात. त्यांचं ते वैशिष्ट्य’, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics News | NCP Chief sharad pawar mocks devendra fadnavis bjp on resignation karnataka assembly election

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निपाणीतील प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादीचा उल्लेख साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असा केला होता. फडणवीस (Maharashtra Politics News) यांनी केलेल्या खोचक टीप्पणीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते काहीही बोलू शकतात, त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात, अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीसांवर टीका केली. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार पुढे म्हणाले, ते काहीही बोलू शकतात, त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात. त्यामध्ये काही लोक वाकबगार असतात. आजच मी इथे आल्यावर पाहिलं कुणीतरी एक पत्रक काढलंय. भाजपाच्या (BJP) अध्यक्षांच्या सहीने आहे बहुतेक ते. त्यांचं (Maharashtra Politics News) म्हणणं असं आहे की रयत शिक्षण संस्थेत मी सभासद नसूनही त्या संस्थेचा ताबा घेतला. रयत शिक्षण संस्थेत (Rayat Shikshan Sanstha) गेली 40 वर्ष मी सभासद आहे. पण असं एक खुळचटपणाचं विधान एका जबाबदार पक्षाच्या नेतृत्वानं करणं याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं, असं शरद पवार म्हणाले.

 

 

आम्ही आमचं काम करत राहू

भाजपकडून शरद पवार यांच्या राजीनाम्यावर ‘स्क्रिप्टेड’ अर्थात नियोजनपूर्वक घडामोडी अशी टीका केली आहे. त्यालाही शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी ते सांगत बसावं, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार करु. त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न मांडत बसावं. त्यांची आम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही, असंही पवार म्हणाले.

 

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीला डिवचत टीका केली.
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे.
कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) मिलीभगत आहे.
हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, अशा शब्दात सीमाभागातील निपाणीमध्ये
फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | NCP Chief sharad pawar mocks devendra fadnavis bjp on resignation karnataka assembly election

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Chowk Marathi Movie | ‘चौक’ची रोमॅंटिक छटा, ‘तुझ्या डोळ्यांच्या डोहात’ गाणं रिलीज; वैशाली भैसने-माडे, ओंकारस्वरूप यांच्या आवाजाने चार चांद

NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली

 

Related Posts