IMPIMP

Maharashtra Politics | हा चोरांचा बाजार आहे, त्यांनी आमचा पक्ष आणि पक्षचिन्ह चोरले, खासदार अरविंद सावंतांचा शिंदे गटावर घणाघात

by nagesh
MP Arvind Sawant | people can wait to bury 40 mlas arvind sawant on shinde group mla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वादावर
निवडणूक आयोगाने (Election Commission) हंगामी निर्णय घेतला आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण
(Dhanushyaban Symbol) दोनही गटांना वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने आदेशात (Maharashtra Politics) जाहीर केले. त्यामुळे
उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला सोमवारपर्यंत नवीन पक्षचे नाव निश्चित करण्याची मुदत देण्यात आली
होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानुसार निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव दिले आहे. तसेच शिवसेनेला त्यांची एकेकाळची जुनी निवडणूक निशाणी मशाल पुन्हा निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले आहे. त्यावर शिवसेनेचे लोकसभा खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्ही आनंदी आहोत, असे खासदार सावंत म्हणाले. तसेच यापूर्वी म्हणजे 90 च्या काळात आमची निशाणी मशाल होती. मशाल ही विचारांची आहे. मशाल सतत तेवत असते, त्यामुळे योगायोगाने आम्हाला पुन्हा मशाल मिळाली आहे, असे देखील सावंत म्हणाले.

 

आम्ही आगामी काळात ही मशाल महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचविणार आहोत. तसेच या महाराष्ट्राने इतक्या नीच प्रवृत्तीचे राजकारण यापूर्वी पाहिले नाही. हा चोरांचा बाजार आहे, त्यांनी आमचा पक्ष आणि पक्षचिन्ह चोरले, असे म्हणत सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या गटावर हल्ला चढविला.

 

भारतीय राज्यघटनेतील (Constitution of India) तरतुदीनुसार एखादा पक्ष फुटून त्यातील 2/3 आमदार किंवा खासदार जर बाहेर पडले, तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. पण त्यांनी तत्काळ दुसऱ्या एकाद्या पक्षात विलीन होणे अपेक्षित असते. शिंदे यांचा गट अद्याप कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तारीख पे तारीख खेळ खेळत आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशात सर्रास संविधानाची चेष्टा केली जात आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे.
ती त्यांच्यावर लवकरांत लवकर झाली पाहिजे, अशी मागणी देखील सावंत यांनी केली.
तसेच आगामी काळात शिंदे यांच्या पक्षाच्या नावातील बाळासाहेब कोण? हे लवकरच जनतेला कळेल,
असे देखील सावंत यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics | This is thieves market, they stole our party and party symbol, MP Arvind Sawant attack on Shinde group

 

हे देखील वाचा :

MLA Ravi Rana | त्यांची सेना ही उद्धव काँग्रेस सेना, पक्षाच्या नवीन नावावरून आमदार रवी राणांची ठाकरेंवर टीका

Pune News | हडपसरमध्ये 15 ऑक्टोबर रोजी कोकण मेळाव्याचे आयोजन

Bhagirath Biyani | खळबळजनक! बीड भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

 

Related Posts