IMPIMP

Manoj Jarange Patil On Munde Sisters-Brother | मुंडे बहीण-भावाला मनोज जरांगे यांचा इशारा, तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय, गुंडगिरी किती दिवस सहन करायची

by sachinsitapure

बीड : Manoj Jarange Patil On Munde Sisters-Brother | मला बीडमध्ये येऊ देणार नाही म्हणता, तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची. आमच्याकडेही खुंखार लोक आहेत. मराठा समाज (Maratha Samaj) इतका लेचापेचा नाही, तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, संभाजीनगरला फिरायचे आहे. मला बीडमध्ये (Beed Lok Sabha) येऊ देणार नाही, असं म्हणतात, मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना इशारा दिला आहे.

बीडच्या नांदुर घाट (Nandurghat Beed) गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमींची भेट मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, मला सुद्धा धमकी देत आहेत, बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये येऊ द्यायचे नाही, असे म्हणत आहेत. आता तर मी रोज बीडमध्ये येणार, दोघं बहीण-भाऊ कार्यकत्र्यांना माझ्या विरोधात धमकीच्या पोस्ट टाकायला सांगत आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला नाव ठेवले त्यावेळेस विरोध केला. पण मी एकदाही म्हणालो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi Candidate) उमेदवार पाडा. पण हे आम्हाला माहिती आहे वेळ निघून गेली की असंच होणार. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे. मात्र, मी मागे हटणार नाही.

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांची मते लागतात, मराठ्याचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्याच्या मतांवर मोठे होतात, पण अन्याय हा प्रत्येकवर्षी सुरु आहे. स्वतःच्या अंगावर संकट असले की पाया पडतात आणि संकट निघून गेले की लगेच बदलतात. आष्टी पाटोद्यात काय झाले, बीडमध्ये काय झाले, माजलगाव आणि परळीमध्ये काय झाले संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे.

मनोज जरांगे म्हणाले, हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे. जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार? माझं रक्षण मराठा समाज करत आहे. मला कोणाची गरज नाही. पोलीस अधीक्षक कशामुळे गुन्हे दाखल करून घेत नाहीत? लेकरांची तडफड होते, गृहमंत्री साहेबांचे राज्य आहे का? अन्याय सुरू आहे.

मराठ्यांच्या नेत्यांनो सावधान, जात संपली की तुम्हीही संपलात, आम्ही शांत पद्धतीने बघणार आहोत. बहिण भाऊ किती दिवस हल्ले करतात ते पाहू. जोपर्यंत सहन होत आहे, तोपर्यंत सहन करू, पण मराठा समाजात खूप मोठी खदखद निर्माण झाली आहे, असे जरांगे म्हणाले.

Loni Kalbhor Pune Crime News | पुणे : महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Related Posts