IMPIMP

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

by sachinsitapure

नांदेड : Maratha Andolak-Ashok Chavan | नुकतेच काँग्रेसमधून (Congress) भाजपामध्ये (BJP) गेलेले नेते अशोक चव्हाण यांना मराठा सामाजाच्या (Maratha Samaj) रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur) कोंढा (Kondha) येथे खासदार अशोक चव्हाण भाजपाच्या प्रचारासाठी आले असताना मराठा समाज बांधांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा समाज आक्रमक झाला होता. अखेर अशोक चव्हाण यांना गावातून परत जावे लागले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मराठा बांधवांच्या गराड्यातून चव्हाण यांची गाडी बाहेर काढली आणि त्यांना मागे जाण्यास सांगितले.

अशोक चव्हाण माघारी निघाल्यानंतर, भाग गया रे, भाग गया अशोक चव्हाण भाग गया… अशी घोषणाबाजी मराठा बांधवांनी केली. अशोक चव्हाण हे नांदेडचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गावात आले होते. परंतु, मराठा समाज बांधवांचा संताप पाहून खासदार अशोक चव्हाण यांनी माघारी जाणे पसंत केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Sanjay Raut On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना जॉनली लीवरशी, संजय राऊत म्हणाले, ”रोज नवे जोक, देशात…”

Related Posts