IMPIMP

Mayor Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’

by nagesh
Mayor Kishori Pednekar | giving padma shri kangana insult hindustan end subject taking action against her demand mumbai Mayor Kishori Pednekar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mayor Kishori Pednekar | आपल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मिडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाबद्दलही वादग्रस्त विधान केलं. यामुळे मागील काही दिवसांपासून कंगणावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. यातच मुंबईच्या विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी देखील कंगणावर प्रहार केला आहे. त्यावेळी पेडणेकर या मुंबईमध्ये बोलत होत्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देशाला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलं.
या वादग्रस्त विेधानानंतर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा तर अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे.
तिच्यावर कारवाई करा आणि विषय संपवा,’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘कंगना जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येते कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची बदनामी करते. पाकिस्तानशी तुलना करते.
दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात ती यायला बघते, अशी जोरदार टीका त्यांंनी केली.
तर, आपल्या देशात अनेक लोक आहेत की जे अतिशय चांगलं काम करतात.
पण हिच्यात काय एवढं टॅलेंट आहे की तिला पद्मश्री पुरस्कार दिला गेला हे मला अजूनही समजलेलं नाही.
कंगनाचं बेताल वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे.
हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या, कंगनाच्या बेताल वक्तव्याची दखल घेऊन तिच्यावर तातडीनं कारवाई करायला हवी अशीही मागणी पेडणेकर यांनी केलीय.
‘माझी गृह विभााला हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशा बेताल मुलीवर निट लक्ष द्यायला हवं.
जी संपर्ण हिंदुस्थानचा अपमान करते आणि सर्व लोकांमध्ये फूट पाडते.
तिचा निषेध आपेल्याला न्यायिक बाजूनं करावं लागेल.
तिच्यावर कारवाई करुन विषय संपवून टाकायला हवा’, असं देखील पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Mayor Kishori Pednekar | giving padma shri kangana insult hindustan end subject taking action against her demand mumbai Mayor Kishori Pednekar

 

हे देखील वाचा :

Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’

Chandrakant Patil | ‘भाजप-शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही’ – चंद्रकांत पाटील

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी; 24 तासात कधीही होऊ शकणार Post-Mortem

 

Related Posts