IMPIMP

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी; 24 तासात कधीही होऊ शकणार Post-Mortem

by nagesh
Modi Government | autopsy will be possible after sunset union health minister announces modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi government | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात सूर्यास्तानंतर शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता आजपासून (सोमवार) भारतात सूर्यास्तानंतर देखील मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी सोमवारी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) या निर्णयामुळे आता ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन (Post-Mortem) करता येणार आहे. दरम्यान यापुर्वी देशात सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी नव्हती. परंतु, आता सूर्यास्तानंतर देखील मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

अवयवदानासाठी शवविच्छेदन (PostMortem) प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे शवविच्छेदन करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतर देखील शवविच्छेदन करता येईल. कोणत्याही प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळीही पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल. असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्णयानूसार, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याशिवाय,
खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह या श्रेणींमध्ये रात्रीच्या वेळी पोस्टमॉर्टम केले जाणार नाही.
केंद्र सरकारकडून (Modi Government) या नवीन निर्णयाबाबत सर्व संबंधित मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारांना सूचित करण्यात आले आहे.

 

Web Title :- Modi Government | autopsy will be possible after sunset union health minister announces modi government

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | वीज बचतीसाठी पुणे महापालिका नेमणार स्वतंत्र कंपनी; विद्युत विभागाने निविदा मागविल्या

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’

Nawab Malik | नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

 

Related Posts