IMPIMP

Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

by nagesh
Menstrual Pain Home Remedies | know the best tips to get rid of menstrual pain

सरकारसत्ता ऑनलाइन – Menstrual Pain Home Remedies | महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी (Menstruation Period) येते. मासिक पाळी म्हणजे महिलांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. सामान्यत: 21 ते 35 दिवसांमध्ये मासिक पाळी येत असते. मासिक पाळी दरम्यान वैज्ञानिकदृष्ट्या महिलांच्या शरीरामध्ये ही एक हार्मोनल प्रक्रिया असते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक दुखण्याला (Menstrual Pain Home Remedies) सामोरे जावे लागते. काही महिलांना कमी प्रमाणात त्रास होतो, तर कित्येक महिलांना मासिक पाळी दरम्यान प्रचंड अशा वेदनेला (Menstrual Pain Home Remedies) सहन करावं लागतं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मासिक पाळी दरम्यान पोट दुखी (Abdominal Pain), पाठ दुखी (Back Pain), कंबर दुखी आणि शारीरिक दुखणे (Body Pain) यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या दुखण्यामुळे महिलांना उठण्यापासून ते बसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातात. दुखणं कमी होण्यासाठी महिला गरम पाण्याचा शेक घेतात. तसेच अनेक घरगुती उपाय करतात ज्याणे दुखणं कमी होण्यास मदत होईल. आपण देखील अजून काही उपाय जाणून घेऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला मासिक पाळीतील (Menstrual Pain Home Remedies) दुखणं कमी होण्यास मदत होईल.

डॉक्टर अंजली कुमार यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना मासिक पाळीत वेदनांच्या तक्रारी जास्त असतील तर वेदनाशामक औषधांचा वापर करू शकतात.

 

वेदना कमी करण्यासाठी ईबुप्रोफेन आणि कॉम्बिफ्लेम यांसारख्या गोळ्या वापरल्या जाऊ शकतात. तसेच डॉक्टरांनी म्हणाले, तुम्ही खुर्चीवर बसून काम करत असाल आणि तुम्हाला दुखण्यामुळं त्रास होत असेल, तर तुम्ही श्वासाचे व्यायाम करा. श्वास घ्या आणि श्वास सोडा, या व्यायामामुळे तुम्हाला मनापासून आराम मिळेल.

 

महिलांना अत्यंत वेदना होत असेल तर, त्यांनी मासिक पाळीच्या काळात आवर्जून कोमट पाणी प्यायला हवा.
कोमट पाणी प्यायल्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.
तसेच ज्या पदार्थामध्ये चरबीयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कार्बोनेटेड, कॅफीन आणि खारट पदार्थ शक्यतो टाळावे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या काळात वेदना टाळण्यासाठी महिलांनी मेफटाल पास या गोळीचा देखील वापर करू शकता.
मात्र लक्षात ठेवा ही गोळी फक्त वेदना होत असतानाच घ्यावी. इतर वेळी घेऊ नये.

 

या काळात दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी योगासने अत्यंत प्रभावशाली आहेत. योगा आपल्या शरीरासाठी चांगला असतो.
तसेच मासिक पाळीच्या काळात वेदना कमी करण्यासाठी प्राणायाम आणि श्वासोच्छवास व्यायाम उत्कृष्ट मानले जातात.
तसेच योगामुळे शरीराला फायदा होतोच. परंतु मानसिक मनस्थिती सुद्धा सुधारते.

 

Web Title :- Menstrual Pain Home Remedies | know the best tips to get rid of menstrual pain

 

हे देखील वाचा :

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा

Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश शमिता शेट्टीला म्हणाली ‘आंटी’, यावर शिल्पा शेट्टीनं दिलं तेजस्वीला जबरदस्त उत्तर

Maharashtra Municipal Election | मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, लातूरसह ‘या’ 20 महानगरपालिकांची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात? असा असू शकतो कार्यक्रम

 

Related Posts