IMPIMP

Milk Farmers Protest | अधिवेशन सुरू असताना दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; रस्ता रोको करत नोंदवला शेतकऱ्यांचा निषेध

by sachinsitapure

शिक्रापूर – (सचिन धुमाळ) : Milk Farmers Protest | राज्याचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू असतानाच दूधाच्या दरावरून शिरूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेली काही दिवसापासून दुधाचे दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शिवबा संघटनेच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, दुधाला कमीत कमी 40 रूपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली, आक्रमक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत ढासळलेल्या दूध दरा संदर्भात सरकारचा निषेध केला.यावेळी सरकारने तातडीने दूध दरवाढ केली नाही तर या पुढच्या काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिला.

Related Posts