IMPIMP

Miss Maharashtra Police Pratibha Sangle | पोलीस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’, शेतकऱ्याच्या पोरीनं केली ‘कमाल’

by nagesh
Miss Maharashtra Police Pratibha Sangle | maharashtra beed police pratibha sangle wins miss maharashtra contest

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Miss Maharashtra Police Pratibha Sangle | बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे (Pratibha Sangale) यांनी ‘मिस महाराष्ट्र’चा (Miss Maharashtra) किताब पटकावला आहे. बीडमध्ये (Beed) महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. कुस्तीपटू (Wrestler), पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. (Miss Maharashtra Police Pratibha Sangle)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

प्रतिभा सांगळे यांनी पोलीस दलात कर्तव्य पार पाडत असताना मिस महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) असून त्या 2010 पासून बीड पोलीस दलात (Beed Police Force) कार्यरत आहेत. सध्या त्या बीड पोलीस मुख्यालयात (Beed Police Headquarters) महिला कॉन्स्टेबल (Constable) म्हणून कर्तव्य बजावत आहेत. पोलीस दल, कुस्ती आणि मॉडलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. (Miss Maharashtra Police Pratibha Sangle)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रतिभा यांना मागील अनेक वर्षापासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेत (Beauty Contest) सहभागी होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात (Pune) पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा (First Runner Up) किताब पटकावत मिस महाराष्ट्र स्पर्धेपर्यंत आणि तेथून थेट विजेतेपदापर्यंत झेप घेतली. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे (Miss India Universe) स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपली पुढची तयारी सुरु ठेवली आहे.

 

 

मिस महाराष्ट्र हा किताब पटकावल्यानंतर प्रतिभा सांगळे म्हणाल्या, माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलात खेळाडू म्हणून जॉइन झाले. त्यानंतर लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेंव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजेत असे वाटले. यातून सौंदर्य स्पर्धेकडे मी वळाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title : Miss Maharashtra Police Pratibha Sangle | maharashtra beed police pratibha sangle wins miss maharashtra contest

 

हे देखील वाचा :

Satara District Sessions Court | सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ! जन्मदात्या बापाची हत्या करणार्‍या मुलाला अखेर जन्मठेप

Pimpri Corona Updates | चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Winter Superfoods For Womens | हिवाळ्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी ‘या’ 4 गोष्टी खाव्यात; जाणून घ्या

 

Related Posts