IMPIMP

MLA Ravi Rana | बच्चू कडूंच्या टीकेला आमदार रवी राणांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘बच्चू कडू हा सोंगाड्या आहे’

by nagesh
Ravi Rana | ravi rana on bacchu kadu devendra fadnavis eknath shinde prahar bjp balasahebanchi shivsena

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी आपल्या मतदार संघात गरीब आणि गरजू लोकांना दिवाळीचा किराणा वाटण्याचा उपक्रम चालविला आहे. त्यावरुन बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू हा एक सोंगाड्या आहे, असे रवी राणा म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मला असे वाटते, बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे काही आंदोलन करतो, ते केवळ तोडपाण्यासाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची एक ओळख आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, माझ्यात धमक आहे. मी गरिबांना किराणा वाटतो, गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी करतो. मुलांच्या शिक्षणाला आणि लग्नाला मदत करतो.

 

तसेच गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंनी दहा वेळा विचार केला पाहिजे. विधानपरिषद, राज्यसभा निवडणूक आल्या की  त्यांना दमडी पाहिजे असते.
सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहिजे, गुवाहाटीला जायचे तर दमडी पाहिजे.
त्यामुळे ज्या माणसाचे जीवनच पैसा आहे त्या बच्चू कडूंची नौटंकी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील लोक पाहात आहेत, असे रवी राणा (MLA Ravi Rana) म्हणाले.

 

बच्चू कडू यांनी एका जाहीर सभेत राणा दांपत्याच्या मोफत किराणा वाटपावर भाष्य करत म्हंटले होते
की, आधी खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, असे महाठग आणि महाअवलादी आपल्या राज्यात आहेत.
तसेच डॉ. आंबेडकरांनी दिलेला मतांचा अधिकार एका किराणा देणाऱ्याला मत देऊन घालवायचा. त्याला निवडून द्यायचे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Ravi Rana | mla ravi rana has responded to the criticism made by mla bachu kadu

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | संजय राऊतांना सुषमा अंधारेंची भिती वाटू लागली आहे, शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

Chhagan Bhujbal | मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती झाली नाही, तर टोल नाके बंद करू, छगन भुजबळांचा इशारा

Bhaskar Jadhav | घरावरील हल्ल्यानंतर प्रथमच भास्कर जाधव माध्यमांसमोर; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

 

Related Posts