IMPIMP

Sushma Andhare | संजय राऊतांना सुषमा अंधारेंची भिती वाटू लागली आहे, शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

by nagesh
Sushma Andhare | shinde group slams sanjay raut says he fears that sushma andhare may take his place of spokesperson

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात अनेक चमत्कारीक घडामोडी घडल्या. सर्वप्रथम 56 वर्षे अविरत उभी असलेली शिवसेना (Shivsena) दुभंगली आणि दोन विरोधी गट तयार झाले. त्यानंतर खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (Enforcement Directorate) अटक केली. शिवसेनेच्या पडत्या काळात आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि संभाजी ब्रिगेड (Sambaji Brigade) यांनी शिवसेनेची साथ दिली. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आल्या दिवसापासून भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाची साले सोलायला सुरुवात केली. त्या संजय राऊत यांच्या तोडीस तोड पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे संजय राऊत यांना तुरुंगातून भिती वाटू लागली आहे की, सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिवसेनेच्या ठाकरे गटात (Thackeray Group) त्यांची जागा घेतात का, अशी शंका आणि दावा शिंदे यांच्या गटाने म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेने (Balasaheb’s Shivsena) केला आहे. आपल्या भाषणामंधील मुद्देसूद मांडणीवरुन आणि वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करुन सुषमा अंधारे अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. त्यात त्यांचे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील (Dasara Melava) भाषण आणि ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेतील भाषण तुफान गाजले आहे.

 

संजय राऊत हे देखील विरोधकांवर रोखठोक टीका करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या टीकेला भाजप आणि शिंदे यांच्या गटातील आमदारांची उत्तर देण्याचे धाडस होत नसे.
पण गेले तीन महिने ते गोरेगाव येथील कथित पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात (Patrachal Land Scam) न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या आवाजात व्यत्यय आला होता. पण सुषमा अंधारे संजय राऊतांची कमी भरुन काढत आहेत,
अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची भावना आहे.

 

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची तुलना केली आहे.
प्रसारमाध्यामांना एक व्हिडीओ प्रसारीत करत शीतल म्हात्रे त्यात म्हणाल्या, संजय राऊतांना भिती वाटत आहे
की, सुषमा अंधारे आपली जागा तर घेत नाहीत ना? म्हणून आता अंधार कोठडीतून देखील ते प्रसार माध्यामांसोबत बोलत आहेत.
संजय राऊत काय बोलत आहेत, कसे बोलत आहेत, त्याची आम्हाला कल्पना नाही,
पण हे सर्व हास्यास्पद वाटत आहे, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sushma Andhare | shinde group slams sanjay raut says he fears that sushma andhare may take his place of spokesperson

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती झाली नाही, तर टोल नाके बंद करू, छगन भुजबळांचा इशारा

Bhaskar Jadhav | घरावरील हल्ल्यानंतर प्रथमच भास्कर जाधव माध्यमांसमोर; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

 

Related Posts