IMPIMP

Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धाच ग्लोबल वॉरीयर्स, एलके इलेव्हन संघाचे विजय!!

by nagesh
Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament Global Warriors

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब आणि एलके इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रिन्स् अरोरा याच्या ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबचा २२३ धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने २७८ धावांचा डोंगर उभा केला. प्रिन्स् अरोरा याने ३२ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावा चोपल्या. राज एस. (४५ धावा), मनीष शेजवाल (४६ धावा) आणि गौरव गोलहार (३६ धावा) यांच्या धावांच्या जोरावर संघाने विशाल धावसंख्या उभी केली. या आव्हानासमोर डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबचा डाव ५५ धावांवर गडगडला. तनिष ठाकरे याने एकाच षटकात ३ गडी टिपले. शाम यादव (३-१०) आणि सुरज शिंदे (२-१७) यांनी बळी मिळवत संघाला मोठा विजय मिळवून दिला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

प्रवण नातू याच्या कामगिरीच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने गेम स्विंगर्स संघाचा २७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एलके इलेव्हन संघाने हृषिकेश आगाशे (नाबाद ४५ धावा), प्रणव नातू (४१ धावा) आणि अभिषेक बोधे (३६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १७९ धावा धावफलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गेम स्विंगर्स संघाचा डाव १५२ धावांवर मर्यादित राहीला. सचिन कांगरकर (४० धावा), नीरज शर्मा (३२ धावा) आणि किरण बोराटे (२२ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. एलके संघाच्या अमित गणपुळे, जयदीप आवाड आणि सुयश भट या गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे संघाने विजय नोंदविला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद २७८ धावा (प्रिन्स् अरोरा ६७ (३२, ७ चौकार, ४ षटकार),
राज एस. ४५, मनीष शेजवाल ४६, गौरव गोलहार ३६, अमोल परदेशी ५-५४, अमीत द्रविड ३-४९)
वि.वि. डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबः १४ षटकात १० गडी बाद ५५ धावा
(अनिकेत कुलकर्णी २२, तनिष ठाकरे ३-०, शाम यादव ३-१०, सुरज शिंदे २-१७); सामनावीरः प्रिन्स् अरोरा;

एलके इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १७९ धावा (हृषिकेश आगाशे नाबाद ४५, प्रणव नातू ४१, अभिषेक बोधे ३६,
किरण बोराटे २-२४) वि.वि. गेम स्विंगर्सः १८.३ षटकात १० गडी बाद १५२ धावा (सचिन कांगरकर ४०, नीरज शर्मा ३२,
किरण बोराटे २२, अमित गणपुळे २-१२, जयदीप आवाड २-१३, सुयश भट २-२६); सामनावीरः प्रणव नातू;

Web Title : Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament Global Warriors

Related Posts