IMPIMP

MP Sujay Vikhe Patil | ‘पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको’ – खा. सुजय विखे

by nagesh
MP Sujay Vikhe Patil | i am mp because pankaja munde sujay vikhe patil pathardi programe nagar news

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन MP Sujay Vikhe Patil | अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंवर (Pankaja Munde) स्तुतीसुमने उधळली आहेत. तर, मी मंत्री शब्दाच्या अगोदर मुख्य लावत नाही. कारण, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

त्यावेळी बोलताना खा. सुजय विखे म्हणाले की, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण.
मला काही फरक पडत नाही, कारण मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही.
असे ते म्हणाले. दरम्यान, भाषणावेळी या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 

तुम्ही माझ्या प्रचाराला आलात आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झालो. मी जेव्हा ताईंकडे गेलो होतो, तेव्हा मला एबी फॉर्मही मिळाला नव्हता.
फक्त माझा भाजपात (BJP) प्रवेश झाला होता. त्यावेळी, ताईंनी मला विश्वास दिला, तू माझ्या भावासारखा आहे, असं त्या म्हणाल्या.
आता, तुमच्या भावाने कॅम्प राबवून 38 हजार लाभार्थी या जिल्ह्यात तयार केले आहेत. असं विखेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आमच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत, असं आमदार मोनिका राधळे (MLA Monica Radhale) यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर, भाषणावेळी सुजय विखे यांनी पंकजा मुडेंमुळेच आपण खासदार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : MP Sujay Vikhe Patil | i am mp because pankaja munde sujay vikhe patil pathardi programe nagar news

 

हे देखील वाचा :

Multi Asset Fund | ‘या’ फंडने गुंतवणुकदारांना दिला शानदार रिटर्न ! 1 लाखांची गुंतवणूक झाली 41.46 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केली संजय राऊत, यशोमती ठाकूरांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…

Pune schools Holiday | पुणे जिल्ह्यातील शाळांना 19 पर्यंत सुट्टी, शिक्षणाधिकारी यांची माहिती

 

Related Posts