IMPIMP

Multi Asset Fund | ‘या’ फंडने गुंतवणुकदारांना दिला शानदार रिटर्न ! 1 लाखांची गुंतवणूक झाली 41.46 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Mutual Fund investment | mutual fund this fund gave great returns rs 41 41 lakh made from 10 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multi Asset Fund | एक म्हण आहे की, कधीही सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये. हिच म्हण तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा त्यामध्ये सुद्धा लागू होते. म्हणजे सर्व पैसे एकाच शेयर किंवा एकाच फंडमध्ये गुंतवू (Investment and Fund) नयेत. ज्या प्रकारचे बाजाराचे वातावरण आहे, अशावेळी तुम्ही मल्टी असेट फंड (Multi asset fund) मध्ये गुंतवणूक करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मल्टी असेट फंड प्रामुख्याने तुमचे पैसे विविध सेक्टर आणि शेयर्समध्ये गुंतवणूक करते.
प्रसिद्ध फंड मॅनेजर संकरन नरेन यांचे म्हणणे आहे की, मल्टी असेटची रणनीती सध्याच्या वातावरणात चांगले रिटर्न देण्यात सक्षम होऊ शकते.

 

मार्च 2020 च्या दरम्यान जेव्हा बाजार पूर्णपणे खाली जात होता, तेव्हा एस. नरेन यांनी हेच म्हटले होते की, बाजार खुप खाली जाऊ शकतो.
गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी निर्माण होत आहे. हे खरेही झाले आणि बाजार 40 हजारावरून घसरून 26 हजारच्या जवळ पोहचला.

 

काय सांगतात जाणकार?

 

ICICI प्रूडेंशियलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) एस. नरेन सांगतात की अशावेळी जेव्हा बाजार आता ऐतिहासिक उंचीवर आहे.
अशावेळी गुंतवणुकदारांनी आपल्या पोर्टफोलियो असेट अलोकेशनबाबत विचार करावा.
त्यांचे म्हणणे आहे की, इक्विटीमध्ये जास्त फोकस करण्याऐवजी गुंतवणुकदारांनी इतर असेट क्लासबाबत विचार केला पाहिजे.
हे डेट, गोल्ड आणि ग्लोबल फंडसह रियल इस्टेट सुद्धा असू शकते. (Multi Asset Fund)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एस. नरेन सांगतात की, मल्टी असेट गुंतवणुकदारांना ही सुविधा देते की, चढ-उताराच्या वातावरणात चांगला रिटर्न ते कमावू शकतील.
यामध्ये जोखीम सुद्धा कमी असते. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठ्या मल्टी असेट फंडमध्ये खउखउख प्रूडेंशियल मल्टी असेटचे नाव येते.

 

या स्कीमची असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 12,405 कोटी रुपये आहे. या कॅटेगरीच्या 65% पेक्षा जास्त AUM आहेत.
या स्कीमचे व्यवस्थापन एस. नरेन करतात. ही स्कीम 10-80% गुंतवणूक इक्विटीमध्ये करते. 10-35% गुंतवणूक गोल्ड आणि ईटीएफ इत्यादी होते.
0-10% ची गुंतवणूक रियल इस्टेट ट्रस्ट किंवा इनविट्समध्ये होते.
याबाबत ICICI प्रूडेंशियलचे MD & CEO निमेश शाह म्हणतात की, संपत्तीच्या निर्मितीत ही स्कीम खुप चांगली काम करते. (Multi Asset Fund)

 

1 लाख रुपयांची गुंतवणूक 41.46 लाख रुपये झाली

 

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 31 ऑक्टोबर 2002 म्हणजे या फंडच्या स्थापनेच्या वेळी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज 41.46 लाख रुपये झाली आहे.
वार्षिक 21.65% चक्रवाढ (CAGR) दराने रिटर्न मिळाला आहे.
याच काळात निफ्टी 50 मध्ये 18.21% CAGR च्या दराने रिटर्न मिळाला आहे.
म्हणजे एक लाखाची गुंतवणूक केवळ 24.05 लाख रुपये झाली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

असेट अलोकेशन स्कीम मोठ्या कालावधीत गुंतवणुकीच्या हिशेबाने चांगली आहे.
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) एका चांगल्या गुंतवणुकीची पद्धत आहे.
जर कुणी या स्कीममध्ये मासिक 10 हजार रुपयांचे SIP केले असेल तर ही रक्कम आज 1.60 कोटी रुपये झाली आहे.
तर त्याची गुंतवणूक केवळ 22.9 लाख रुपये होती.
म्हणजे महिन्याचा 17.78% चा CAGR रिटर्न राहिला.

 

Web Title : Multi Asset Fund | mutual fund multi asset fund give good return 1 lakh become 41 46 lakh rupees check details

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केली संजय राऊत, यशोमती ठाकूरांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…

Pune schools Holiday | पुणे जिल्ह्यातील शाळांना 19 पर्यंत सुट्टी, शिक्षणाधिकारी यांची माहिती

Kangana Ranaut | कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो Viral

 

Related Posts