IMPIMP

MP Supriya Sule | RSS वर बंदीची मागणी कोणी केली असेल तर…, खा. सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

by nagesh
Supriya Sule | if only two people are deciding the cabinet what about the rest of the ministers supriya sule on shinde and fadanvis government

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन– पीएफआयवरील (PFI) बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून
केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे (MP
Supriya Sule) आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्र सरकारने (Central Government) पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी केली असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या (Constitution) चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी दिली आहे. तसेच पीएफआयवरील बंदी संदर्भात संसदेत देखील केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

 

केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigative Agencies) विरोधी पक्षांवर कारवाई करण्यावर त्यांनी टिका केली. गेल्या काही दिवसांत 90 छापे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर झाले आहेत.
भाजप (BJP) लाँड्रीत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपचेच नेते म्हणतात.
मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती.
जे घडतय ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, महागाई आणि सिलिंडरच्या वाटपावरुनही त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
एकतर नवरात्र, दिवाळी आहे. त्यात केंद्र सरकारने एका महिन्याला केवळ 2 सिलेंडर देण्याचा निर्णय केला आहे.
सिलिंडरची कमतरता आहे का? याच उत्तर आगोदर केंद्राने द्यावे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते.

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule reaction on rss ban demand after pfi

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | बनावट लोन ॲपचा कॉलसेंटरचा पुणे पोलिसांकडून पर्दापाश; 18 आरोपी अटकेत, एक लाख लोकांचा गोपनीय डाटा पोलिसांच्या हाती

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी, नव्या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा चर्चेत

Shivsena | एक नेता, एक नाथ…विरूद्ध…निष्ठेचा सागर उसळणार, दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीत शिवसेना-शिंदे गटाचा टीझरद्वारे एकमेकांवर निशाणा

 

Related Posts