IMPIMP

Pune Cyber Crime | बनावट लोन ॲपचा कॉलसेंटरचा पुणे पोलिसांकडून पर्दापाश; 18 आरोपी अटकेत, एक लाख लोकांचा गोपनीय डाटा पोलिसांच्या हाती

by nagesh
Pune Cyber Crime | Fake loan app call center busted by Pune Cyber police; 18 accused arrested, confidential data of one lakh people in hands of police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Crime | लोन अ‍ॅपच्या (Online Loan App) माध्यमातून देशभरात नागरीकांना गंडा (Cheating Case) घालणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पर्दापाश केला आहे. पोलिसांनी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) असलेले कॉल सेंटर (Call Center In Bengaluru) उध्वस्त केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि बेंगोलरमधून १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. फ्रॉड लोनच ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक (Fraud Case) झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशातील १ लाख लोकांची फसवणूक होणार होती. मात्र, पोलिसांनी टोळीला अटक करून मोठा गैरव्यवहार थांबवला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले स्वप्निल नागटिळक,श्रीकृष्ण गायकवाड,धीरज पुणेकर,प्रमोद रणसिंग,मुमताज कुमठे,सॅम्युअल कंदीयल पिता इब्राहिम,मोहम्मद मनियत पिता मोहिदू यांना महाराष्ट्र मधून वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे,तर ११ आरोपी बेंगलोरहुन अटक केली आहे. (Pune Cyber Crime)

 

लोक कॉल सेंटरचे काम करणारे आरोपी आहेत.हे लोन अ‍ॅप कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा वापरून ,शिवीगाळ करून तसेच धमकी देण्याचे मेसेज कॉल करण्याचे काम करत होते, त्यांच्याकडे लोन ॲप कंपनीमार्फत लोनचे कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचे खाजगी डेटा व त्यांच्याकडील जप्त डिजिटल डिव्हायसेस व कागदपत्रांमध्ये मिळून आला सदर कॉल सेंटर १६ पेक्षा जास्त लोन एप्लीकेशन कामकाज चालत असल्याचं पोलिसांनी सागितले आहे.

 

महाराष्ट्रातून ज्या आरोपीना अटक करण्यात आली त्याच्याकडून मोबाइल हँडसेंट सिमकार्ड एकूण ४८,
बँक खाते ५६,संगणक व लॅपटॉप चेकबूक पासबुक २७,इतर कंपनी सिम ३०,डेबिट कार्ड १६७,पेटीएम मशीन १,
पॅनकार्ड १५,आधारकार्ड ११,मतदार कार्ड ४ शिक्के ४ असा मुद्देमाल तर बेंगोलरहुन जे आरोपी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून दहा सिमकार्ड, हजेरी रजिस्टर,ओळखपत्र, लेटरहेड,नोंदवही,डीव्हीडी,पंधरा लॅपटॉप,
इंटरनेट कनेक्टर,स्विच मशीन,तीन इंटरनेट राऊटर,पीडितांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट,५० इन्व्हाईस फाइल्स,
दहा मोबाईल,फोन हेडफोन असा सायबर पोलिसांनी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लोन अ‍ॅपच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. त्यामध्ये अनेक जणांची फसवणूक झाली.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जवळपास १ लाख लोकांची होणारी फसवणूक टळली आहे.
यामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का, फसवणूक झाली का याचा तपास पुणे सायबर पोलिस करत आहेत.

– भाग्यश्री नवटके (DCP, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखा) – (IPS Bhagyashree Navtake)

 

Web Title :- Pune Cyber Crime | Fake loan app call center busted by Pune Cyber police; 18 accused arrested, confidential data of one lakh people in hands of police

 

हे देखील वाचा :

Shivsena | एक नेता, एक नाथ…विरूद्ध…निष्ठेचा सागर उसळणार, दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीत शिवसेना-शिंदे गटाचा टीझरद्वारे एकमेकांवर निशाणा

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी, नव्या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा चर्चेत

Dasra Melava | जर एकाचवेळी दसरा मेळाव्याचे भाषण सुरू झाले तर कुणाचे भाषण प्रथम ऐकाल, ठाकरे की शिंदे? अजित पवारांनी दिले हे उत्तर…

Related Posts