IMPIMP

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

by nagesh
Mukesh Ambani | car found with the explosives has no connection with the terrorist organization say nia

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani ) यांच्या घराजवळ सापडलेल्या एका गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. या घनटेनमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) करीत असून एनआयएकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनआयएच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात एनआयएकडून आणखी एक खुलासा करण्यात आला आहे.

मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर नव-नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नव्हता आणि टेलिग्रामवर पाठवण्यात आलेला मेसेज हा खोटा होता, असा खुलासा आता एनआयएने केला आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली होती. तो टेलिग्रामवरील मेसेज निव्वळ खोडसाळपणा होता, अशी माहिती एनआयएच्या दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे.

अंबनी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके आढळून आली.
तसेच एक धमकीचे पत्र मिळाले होते. या प्रकरणाची जबाबदारी जैश अल हिंद नावाच्या संघटनेने घेतली होती,
असे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशीत केले होते.
त्यानंतर आता एनआयएने जैश अल हिंद अशी कोणतीही संघटना नाही.
मात्र, गाडी मायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट आहे.
या प्रकरणात इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले होते. तपासात हे सर्व खोटे असल्याचे समोर आले आहे.

तुकाराम मुंढे यांनी घेतली कोरोना लस अन् म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाले – ‘तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?’

Related Posts