IMPIMP

Multibagger Stock | 36 पैशांवरून 1600 रुपयांच्या पुढे गेला ‘हा’ शेअर, रू. 10000 चे केले 4 कोटी रुपये; तुम्ही घेणार आहात का ?

by nagesh
Multibagger Stock | jyoti resins and adhesives ltd share delivered huge 4 lakh percent multibagger return 10k turn 4 crore rupee

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stock | जर तुम्ही शेअर बाजारातून कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला धीर धरावा लागेल. शेअर बाजारातील (Stock Market) दिग्गजांच्या मते, केवळ शेअर्स खरेदी – विक्री करून पैसा कमावला जात नाही, तर संयम बाळगून पैसा कमावला जातो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक म्हण आहे की, खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा… गुजरातची ज्योती रेझिन्स आणि अ‍ॅडेसिव्हज लिमिटेड (Jyoti Resins and Adhesives Ltd) कंपनी हे याचे खास उदाहरण आहे. (Multibagger Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वास्तविक, या कंपनीच्या शेअरनी त्यांच्या गुंतवणूकदारांना घसघशीत रिटर्न देऊन आश्चर्यचकित केले आहे. कंपनीच्या स्टॉक (Stock Return) ने जवळपास 18 वर्षांत 4,54,900 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Share Market Marathi News)

 

एकेकाळी किंमत होती 36 पैसे
30 एप्रिल 2004 रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ज्योती रेजिन्स अँड अ‍ॅडेसिव्हज लिमिटेड (Jyoti Resins & Adhesives Ltd share price) चा शेअर 36 पैसे प्रति शेअर या पातळीवर होता. आता कंपनीचा शेअर रु. 1,638.55 (11 मार्च 2022 रोजी बीएसईची बंद किंमत) वर पोहोचला आहे.

या दीर्घ कालावधीत शेअरने आपल्या शेअरधारकांना 4,54,900 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 10 वर्षांत, कंपनीचा शेअर 9.32 रुपयांवरून (16 मार्च 2012, बीएसई वर बंद किंमत) 1,638.55 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच दहा वर्षांत या शेअरने सुमारे 1,7475.11 टक्के मजबूत रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

पाच वर्षांत 2,273% रिटर्न
गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक रु. 69 (18 डिसेंबर 2017 रोजी) वरून रु. 1,638.55 पर्यंत वाढला आहे.
या कालावधीत त्याने आपल्या शेअरधारकांना 2273.91 टक्के रिटर्न दिला आहे.
एक वर्षापूर्वी 15 मार्च 2021 रोजी या शेअरची किंमत बीएसईवर 480.10 रुपये होती.

म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 241.29% वाढ झाली आहे. या वर्षी 2022 मध्ये स्टॉक 46.38% वाढला आहे.
त्याच वेळी, या महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 20.12 टक्के वाढ झाली आहे.
मात्र, गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये विक्रीचा दबाव आहे आणि 1.23 टक्क्यांनी तोटा सहन करावा लागला आहे.

 

गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फायदा

Jyoti Resins & Adhesives Ltd च्या शेअर प्राईस हिस्ट्रीनुसार,
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 वर्षांपूर्वी 36 पैसे प्रति शेअर दराने 10,000 रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक आत्तापर्यंत कायम ठेवली असती, तर आज ही रक्कम 4.55 कोटी रुपये झाली असती.

दहा वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने 9.32 रुपये दराने 10,000 रुपये गुंतवले असते,
तर आज ही रक्कम 17.58 लाख रुपये झाली असती.
पाच वर्षांत 10 हजारांची गुंतवणूक 2.37 लाख रुपये झाली असती.
एका वर्षात 10 हजारांची गुंतवणूक 34.12 हजार रुपये झाली असती.

 

कंपनीबाबत जाणून घ्या
17 डिसेंबर 1993 रोजी ज्योती रेजिन्स अँड अ‍ॅडेसिव्हज लिमिटेडची स्थापना करण्यात आली.
कंपनीने 22 फेब्रुवारी 94 रोजी व्यवसाय सुरू केला. ती पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून वर्गीकृत आहे आणि ती गांधीनगर, गुजरात येथे आहे.
जगदीश पटेल हे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

जेआरएएल रेजिन आणि अ‍ॅडेसिव्ह बनवते. कंपनीचे मार्केट कॅप 655.42 कोटी रुपये आहे.
कंपनीचे शेअर्स 28 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर 1,889.00 रुपयांवर पोहचला होता.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | jyoti resins and adhesives ltd share delivered huge 4 lakh percent multibagger return 10k turn 4 crore rupee

 

हे देखील वाचा :

Nitin Raut | मोठा दिलासा ! ‘इतके’ महिने वीज तोडणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय; नितीन राऊतांनी केली मोठी घोषणा

Healthy Diet After Covid | कोरोनाच्या नंतर होत असेल मेंदूवर परिणाम तर ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Weather Today | मुंबईत ‘हीट वेव्ह’चा अलर्ट ! उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत तापमानात वाढ, जाणून घ्या आजचे हवामान

 

Related Posts