IMPIMP

Mumbai Crime | बोरीवलीत काळीज पिळवटून टाकणारी घटना; बाळाला दूध पाजत असताना आईला कारने चिरडले

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMumbai Crime | बोरीवलीतील आर एम भट्ट रोडवर (RM Bhatt Road Borivali) काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिवसभर फुगे विकून आल्यानंतर रात्री बाळाला दूध पाजत (Breastfeeding the Baby) असताना भरधाव कारने आईला चिरडले (Crushed by Car) तर तिच्या कुशीत असलेले बाळ (Baby) या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कारचालक फरार (Mumbai Crime) झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लाडबाई धनराज बावरिया Ladbai Dhanraj Bavaria (वय-29, रा राजस्थान) असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बावरीया कुटुंबीय गेल्या दोन महिन्यापूर्वीच घोडबंदर रोड (Ghodbunder Road) परिसरात राहण्यास आले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी धनराज बावरिया आणि त्यांची पत्नी लाडबाईसह पाच महिन्याचा देवांश मुंबईत (Mumbai Crime) आले होते. नोकरी न मिळाल्याने उदरनिर्वाह चालवण्यासाठी सिग्नलवर फुगे व स्ट्रीट लाइट विकणे सुरू केले. कोरा केंद्र सिग्नल (Blank Center Signal) येथे नेहमीप्रमाणे 1 फेब्रुवारीला धनराज फुगे विकण्यासाठी पत्नीसोबत आले. पत्नी मुलासह सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला फुगे विकत होती, तर ते दुसऱ्या ठिकाणी होते.

 

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पत्नीला कारने धडक दिल्याचे धनराज यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पत्नी आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान, लाडबाई यांचा मृत्यू झाला तर देवांशच्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लाडबाई या देवांशला स्तनपान करत असताना कारचालकाने धडक दिली. पण बाळाला घट्ट कवटाळून ठेवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला असून पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. कार्यवाही पूर्ण केल्यानंतर लाडबाई यांचा मृतदेह कुटूंबियांकडे देण्यात आला असून बावरिया कुटुंबीय राजस्थानला रवाना झाले आहेत. तेथे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान , घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेत, कारचालकाचा शोध सुरू केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत (Senior Police Inspector Ninad Sawant) यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धनराज बावरिया म्हणाले की, तीन मुलांचा सांभाळ करणे पत्नीमुळे शक्य होते.
पण आता तीही सोबत नाही. लहान मुलाच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली आहे.
दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले असून मुलाच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला आहे.
त्या कारचालकावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Mumbai Crime | crushed by car while breastfeeding baby mother killed baby seriously injured in borivali incident the search for the driver continues

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 33 रुपयांचा ‘हा’ शेयर रू. 113.65 वर पोहचला, केवळ 21 दिवसात गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 3.39 लाख, तुमच्याकडे आहे का?

Loan Guarantor | विचारपूर्वक राहा Loan गॅरंटर ! लोन डिफॉल्ट झाल्यास भरावे लागतात पूर्ण पैसे, जाणून घ्या सविस्तर

नवी सुविधा ! केवळ 1 मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटूंबाला मिळेल Aadhaar PVC card, पहा सोप्या स्टेप्स

 

Related Posts