IMPIMP

Murlidhar Mohol Rally In East Pune | पुणे महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीने पूर्वेकडील पुण्यात पुन्हा संचारला उत्साह

by sachinsitapure

पुणे :  – Murlidhar Mohol Rally In East Pune | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Election 2024) महायुतीचे भाजप उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Vidhan Sabha) रॅली काढण्यात आली. या रॅलीने पूर्वेकडील पुण्यात पुन्हा उत्साह संचारला. धानोरीच्या जकात नाक्यापासून (Dhanori Jakat Naka) प्रचंड गर्दीत सुरू झालेली ही रॅली धानोरी गावठाण (Dhanori Gaothan), मुंजाबा वस्ती (Munjaba Wasti) , टिंगरेनगर (Tingre Nagar), महाराणा प्रताप चौक (Maharana Pratap Chowk) या परिसरातून आनंद गार्डन येथे पोहोचली. तिथे भव्य स्वागत करण्यात आले. त्यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, विकसित भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे आवर्जून नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून देशात आणखी अनेक योजना साकारायच्या आहेत, त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन मोहोळ यांनी मतदारांना केले. त्यानंतर ही रॅली विश्रांतवाडी (Vishrantwadi), कळस (Kalas), भारतनगर (Bharat Nagar), एकतानगर (Ekta Nagar), लुंबिनी गार्डन (Lumbini Garden in Yerawada), ईशान्य मॉल (Ishanya Mall) , इंदिरानगर (Indira Nagar Yerawada) परिसरातून जात हरी गंगा सोसायटी जवळ समारोप झाला.

रविवार असूनही अनेक जण उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येत होते. अनेकांना नव्याने काहीतरी सांगायचे होते. काहींच्या समस्या, तर काहींच्या भावना ऐकत-समजून घेत रॅली सर्वसामान्यांचा आवाज बनली. अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने रॅलीची रंगत वाढत गेली.

या रॅलीत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik), नगरसेवक अनिल (बॅाबी) टिंगरे (Anil Bobby Tingre), रेखा टिंगरे (Rekha Tingre), सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende), ऐश्वर्या जाधव, सतिश म्हस्के, अयुब शेख, अशोक कांबळे, अर्जुन जगताप यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts