IMPIMP

Murlidhar Mohol Rally In Karve Nagar Pune | मुरलीधर मोहोळ यांची कर्वेनगर परिसरात प्रचारफेरी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

by sachinsitapure

पुणे : – Murlidhar Mohol Rally In Karve Nagar Pune | कर्वेनगरच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये निघालेल्या प्रचार फेरीत मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या Bharatiya Janata Party (BJP) पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले. गेली अनेक वर्षे समाजकारणात वावरत असल्याने या ना त्या कारणाने अनेक मतदार अनेकदा भेटलेले आहेतच. मात्र, प्रत्यक्ष घराजवळ भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. साहजिकच त्यांच्या भेटण्यात सहजता होती. हस्तांदोलनात आपलेपणा होता. डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव होते, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, हे सारं करतानाच त्यांच्या सूचना आणि कल्पनाही ऐकून घेतल्या. त्यातल्या सर्वच लोकसभा सदस्याच्या कक्षेतल्या नसतात. पण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसमोर जाताना तुम्ही मतदारांच्या सर्वच समस्या ऐकायच्या असतात. त्या ऐकल्यानं एक आपुलकीची भावना त्यांच्या डोळ्यांत मला स्पष्ट दिसत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या स्वप्नातील भारत घडविताना अनेक योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून द्यायला हवं, हेही मोहोळ यांनी सांगितले. सरकार-दरबारी आणि कुठेही येणाऱ्या अडचणी सोडविण्याचं आश्वासन त्यांनी दिले. या प्रचारफेरीत अनेक ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद देत होती. या साऱ्याच वातावरणानं मतदारांपेक्षा मीच भारावून गेलो, असे मोहोळ म्हणाले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

Related Posts