IMPIMP

Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

by nagesh
Nameplates In Marathi | wine shop banned from naming great people forts maharashtra

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Nameplates In Marathi | राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला होता. आता याबाबत कायदा (Law) आला असून यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानासमोर मराठी भाषेतील नामफलक (Nameplates In Marathi) असणं गरजेचं आहे. मात्र मद्याच्या दुकानांना (Wine Shops In Maharashtra) महान व्यक्तींची आणि गड किल्ल्यांची नावं (Names of Forts) देता येणार नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्या दुकानांमधून मद्य (Alcohol) पुरवलं जातं म्हणजेच वाईन शॉप आणि बार (Wine Shops & Bars) चालकांना नामफलकावर (Nameplates In Marathi) किंवा दुकानांच्या आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची आणि गड किल्ल्यांची नावं लिहिता येणार नाही. दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास 16 मार्च 2022 रोजी राज्यपालांनी (Governor) संमती दिली असल्याने, 17 मार्च 2022 पासून हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.

 

नामफलकावरील मराठी अक्षराचा आकार हा इतर कोणत्याही फॉन्टपेक्षी (Font) कमी नसावा. त्यासोबतच मराठी भाषेतील अक्षरलेखन हे सुरूवातीलाच येणं गरजेचं आहे, अशी तरतुद या अधिनियमात केली आहे. त्यासोबतच सर्व कार्यालयामध्ये कामकाजाची भाषा ही मराठी होणार असून सरकारी, महापालिका कार्यालयामध्येही मराठी भाषा (Marathi language) ही कामकाजाची भाषा होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.
मात्र त्यानंतर आधीपासूनच या मागणीसाठी अग्रेसर असलेल्या मनसेने (MNS) त्यांना इशारा दिला होता.
पाट्यांच्या खर्च जास्त की काचांचा?, असं म्हणत मनसेने सूचक इशारा दिला होता.

 

Web Title :- Nameplates In Marathi | wine shop banned from naming great people forts maharashtra

 

हे देखील वाचा :

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे

Pune Crime | पुण्यात कॅफे चालवणाऱ्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, दुकान मालकावर FIR

Chandrakant Patil | ‘अजित पवार हुशार राजकारणी, वेळ मारून नेतात’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts