IMPIMP

Narayan Rane | ‘सिंधुदुर्ग झालं आता राज्याकडे लक्ष’ !

by nagesh
Narayan Rane | sindhudurg district bank election bjp leader and union minister narayan rane criticizes shivsena

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपने (BJP) गड राखला आहे. भाजप पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मेहनतीला यश मिळालं असून, या विजयाचं श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जातं, त्याचबरोबर या बँकेवर आपली नाही तर भाजपची (BJP) सत्ता आल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माध्यमांंशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर आपलं लक्ष राज्याकडे असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर आहे. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे आहे,’ असं देखील राणे यांनी म्हटलं आहे.

 

पुढे नारायण राणे म्हणाले, ‘जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केलं जाईल. तसेच बारामतीसाठी आता या बँकेतून कर्ज
दिलं जाणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 3 पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले नाही, ज्यांचे
चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नसल्याचं ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (Sindhudurg District Bank Election) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली.
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.

नंतर महाविकास आघाडीचा पराभव करुन भाजपने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळे राणे समर्थकांनी जिल्ह्यात जोरदार जल्लोष केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिंकल्यानंतर राणे समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title : Narayan Rane | sindhudurg district bank election bjp leader and union minister
narayan rane criticizes shivsena

 

हे देखील वाचा :

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या मोठ्या कमतरतेचे संकेत आहेत ‘ही’ 5 लक्षणे, बहुतांश लोक करतात दुर्लक्ष

Sindhudurg District Bank Election | ‘ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली’, नारायण राणे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक; राणे समर्थकांचा महाविकास आघाडीला दणका

 

Related Posts