IMPIMP

Narayan Rane | ‘हे तीन पक्षांचं सरकार…’; नारायण राणेंनी सांगितला ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त

by nagesh
Narayan Rane | the three party government will collapse in june predicted by narayan rane in washim

वाशिम : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून
अनेकवेळा भाजप (BJP) नेत्यांनी हे सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही
एप्रिल महिन्यात हे सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही सरकार
पडण्याचा नवा मुहूर्त सांगितला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळणार असल्याचा दावा नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. वाशिममध्ये (Washim) घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.

 

 

आमच्याकडे कोकणात (Konkan) मे महिन्याच्या शेवटी किंवा जुनच्या सुरूवातीला वादळ येतं. या वादळामध्ये हलणारी झाडं ही कोसळून पडतात. हे सरकार तीन पक्षांचं असून झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत ते खोडावर नाहीत. ते जून महिन्याच्या आधी जाणार जय हिंद जय महाराष्ट्र, असं नारायण राणे म्हणाले.

 

 

दरम्यान, संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारल्यावर, संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका मी त्यांना पत्रकार मानत नाही.
त्यांची भाषा आणि वैचारिकता पाहता त्यांच्या पत्रकात शिवीगाळ होती, त्यांना बोलायला जागा आहे का?,
त्यांनी काळ्या पैशाने घेतलेली संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगण्याती नैतिकता नाही अशा लोकांना मी किंमत देत नसल्याचं म्हणत राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

 

 

Web Title :- Narayan Rane | the three party government will collapse in june predicted by narayan rane in washim

 

हे देखील वाचा :

Pune Police | अवैध धंद्यांची वसुली करणे पडले महागात, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

 

Related Posts