IMPIMP

Nashik ACB Trap Case | भूमिअभिलेखचा भूकरमापक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure

नाशिक :  – Nashik ACB Trap Case | मोजणी करण्यासाठी तसेच जमिनीच्या हद्दीत खुणा दाखवण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच घेताना त्रंबकेश्वर येथील भूमिअभिलेख विभागाचे प्रभारी भूकरमापक सचिन भाऊसाहेब काठे Sachin Bahusaheb Kathe (वय-37 रा. रिव्हर राईन नेस्ट , फ्लॅट नं. 203 , दसक, जेलरोड, नाशिक रोड) यांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.26) सापळा रचून करण्यात आली. (Nashik Bribe Case)

याबाबत 49 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे मंगळवारी (दि.25) तक्रार केली होती. तक्रारदार यांची मौजे अंजनेरी ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक येथील सर्व्हे नं. १९९/ब मध्ये ४० गुंठे जमीन आहे. जमिनीची मोजणी करुन खुणा दाखवण्यासाठी भूकरमापक सचिन काठे याने तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबी कार्यालयात येऊन सचिन काठे लाच मागत असल्याची तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने बुधवारी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी सचिन काठे याने 40 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 35 हजार रुपये लाच मागितली. त्यानुसार पथकाने सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपये लाच घेताना सचिन काठे याला रंगेहाथ पकडण्यात आले. काठे याच्यावर मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस अंमलदार प्रभाकर गवळी, संदिप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

Related Posts