IMPIMP

Nashik Police | पोलीस चौकीतच रंगली होती ओली पार्टी ! नागरिकाला झिंगलेल्या पोलिसांनी केली मारहाण; प्रचंड खळबळ

by nagesh
Nashik Police | Cocktail Party In DK Nagar Police Chowki Of Gangapur Police Station Nashik Police Force Civilian beaten by drunken police Huge excitement

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनNashik Police | गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकीमध्ये (DK Nagar Police Chowki) टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकाला पोलिसांनी (Nashik Police) दरवाजा लावून घेत लाईट बंद करुन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांची पोलीस (Nashik Police) चौकीतच पार्टी रंगली असताना हा प्रकार पाहिल्याने झिंगलेल्या पोलिसांनी या नागरिकालाच मारहाण केल्याच समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ ठाकूर, सागर बोधले, सुरेश जाधव, मयूरसिंग अशी पार्टी करणार्‍या संशयित पोलिसांची नावे आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी बाळासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड, आकाशवाणी टॉवर, निर्मला शाळेचा परिसर सुशिक्षित उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो.
या भागात डी. के. नगर पोलीस चौकी आहे.
उद्यानात बसलेल्या टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी शिंदे मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस चौकीत गेले होते.
त्यावेळी तेथे ५ ते ६ पोलीस कर्मचारी (Nashik Police) दारु पित बसलेले त्यांना दिसले.
त्यांनी तक्रार देण्याविषयी विचारल्यावर या पोलिसांनी त्यांना आत बोलावून घेतले आणि लाईट बंद करुन मारहाण केली.
हा प्रकार आजू बाजूला असलेल्या नागरिकांना समजला.
तेव्हा नागरिकांची मोठी गर्दी तेथे झाली. तेव्हा पोलिसांनी शिवीगाळ करीत तेथून पळ काढला.
तरीही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करीत एकाला पकडून ठेवले.
या घटनेची माहिती समजल्यावर सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना (ACP Dipali Khanna) व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मद्यपी पोलिसांपैकी एकाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले होते. इतर चौघे जण पळून गेले आहेत.

 

Web Title :- Nashik Police | Cocktail Party In DK Nagar Police Chowki Of Gangapur Police Station Nashik Police Force Civilian beaten by drunken police Huge excitement

 

हे देखील वाचा :

Side Effects Of Drinking Excess Water | तुम्ही एका दिवसात 3 लीटरपेक्षा जास्त पाणी पिता का, तर जाणून घ्या शरीरावर होणारे याचे गंभीर परिणाम

Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

Murbad Police | मुरबाड पोलिस ! 5 तोळे सोन्याचे मंगळसूत्र परत मिळवून देण्यत यश

 

Related Posts