IMPIMP

National Anthem Mandatory In UP Madrasas | योगी सरकारचा मोठा निर्णय ! उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य

by nagesh
National Anthem Mandatory In UP Madrasas | national anthem mandatory in madrassas in uttar pradesh big decision of yogi govt

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था National Anthem Mandatory In UP Madrasas | उत्तर प्रदेश राज्यात योगी सरकारने (Big decision of Yogi Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे (National Anthem Mandatory In UP Madrasas). वर्ग सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावे लागणार आहे. आजपासूनच (गुरुवारी) या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे (Madrasa Education Board) रजिस्ट्रार एस. एन. पांडे (Registrar S. N. Pandey) यांनी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना याबाबत आदेश जारी केला आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशे सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इतर प्रार्थनेसह राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे. (National Anthem in Madrasa)

 

दरम्यान, या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना नियमितपणे देखरेख करावी लागणार आहे.
मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे.

 

Web Title :- National Anthem Mandatory In UP Madrasas | national anthem mandatory in madrassas in uttar pradesh big decision of yogi govt

 

हे देखील वाचा :

International Art Expo Pune 2022 | ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे शानदार उद्घाटन ! देशभरातील चित्रकार व शिल्पकारांचा सहभाग, रविवारपर्यंत पुणेकरांना पर्वणी

BJP on Uddhav Thackeray | शरद पवारांसोबतचं व्यंगचित्र काढत भाजपाचं ट्वीट; राष्ट्रवादीनं दिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Elections-2022 | महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर; जाणून घ्या मतदानाची तारीख

 

Related Posts