IMPIMP

International Art Expo Pune 2022 | ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’चे शानदार उद्घाटन ! देशभरातील चित्रकार व शिल्पकारांचा सहभाग, रविवारपर्यंत पुणेकरांना पर्वणी

by nagesh
International Art Expo Pune 2022 | Great inauguration of International Art Expo Pune ! Participation of painters and sculptors from all over the country

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनInternational Art Expo Pune 2022 | वॉटर कलर, म्युरल, चारकोल, ग्लासपेटींग, पोट्रेट, पोस्टर कलर, ऑइल
कलर, सिरॅमीक, अॅकरॅलीक, स्क्लपचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपारीक चित्र, शिल्पांचा मेळ असलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट
एक्स्पो पुणे’ या वैविध्यपूर्ण चित्र – शिल्प प्रदर्शनाचा शनदार उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. येत्या रविवारपर्यंत पुणेकरांना या प्रदर्शनाची पर्वणी
अनुभवता येणार आहे. (International Art Expo Pune 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आर्टक्यूब गॅलेरिया पुणेच्या वतीने ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ चे आज मिस इंडिया रनरप सोनाली काकडे व दिवा पीजेन्ट्स मॉडेल ग्रुमिंगचे कार्ल
मासकेरन्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंतराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार उमाकांत कानडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विभाग
प्रमुख अनुपमा पाटील, चित्रकार चारूहास पंडित, आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमल चे झोनल बिजनेस मॅनेजर नंदकुमार
गायकवाड, ग्राफीनेट सोल्युशनचे चेतन मोरे, एमआयटी स्कुल ऑफ डिझाईन च्या एचओडी श्रुती निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. (International Art Expo Pune 2022)

 

 

या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये जवळपास 400 चित्रकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथूनही कलाकार आपली कला येथे सादर करीत आहेत.

यावेळी मिस इंडिया रनरप सोनाली काकडे म्हणाल्या, कलेला आपल्याकडे प्रोफेशनली पाहण्याचा दृष्टिकोण खूप कमी आहे. पण प्रामुख्याने पुण्यात कलेकडे खूप आदराने पाहिले जाते. सर्वाधिक चित्रप्रदर्शन ही पुण्यात भरवली जातात. अन् अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र प्रदर्शन पाहिली की कलाकारांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर म्हणाले, या प्रदर्शनात जवळपास 400 हून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र व शिल्प येथे पुणेकरांना पहायला उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन येत्या 15 मे 2022 पर्यंत शुभारंभ लॉंन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथे सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. या चार दिवसीय इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोमध्ये रोज संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत लाईव्ह पेंटींग डेमो असणार आहेत. या इंटरनॅशनल आर्ट एक्स्पोला पुणेकरांनी भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अतुल काटकर व प्रमोद माने यांनी केले आहे.

 

 

Web Title : International Art Expo Pune 2022 | Great inauguration of International Art Expo Pune ! Participation of painters and sculptors from all over the country

 

हे देखील वाचा :

BJP on Uddhav Thackeray | शरद पवारांसोबतचं व्यंगचित्र काढत भाजपाचं ट्वीट; राष्ट्रवादीनं दिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Elections-2022 | महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर; जाणून घ्या मतदानाची तारीख

Yoga Asanas For Hormonal Imbalance | हार्मोन असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात; ‘या’ आसनांच्या मदतीने मिळू शकतात फायदे

 

Related Posts