IMPIMP

NCP Jayant Patil On AIMIM Alliance | ‘एमआयएमला जर महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर…’; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य !

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Jayant Patil On AIMIM Alliance | एकीकडे भाजप (BJP) ठाकरे सरकारचे (Thackeray Government) आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) औरंगाबादचे (Aurangabad) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी युतीची ऑफर केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एमआयएमला महाविकास आघाडीसोबत यायचं असेल तर ते भाजपविरोधी आहेत आणि आम्ही भाजपला पराभूत करण्यास उत्सुक आहोत, हे एमआयएमला कृतीतून दाखवावं लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जलील यांची (Health Minister Rajesh Tope) भेट कोणत्या कारणामुळे घेतली याबाबतही पाटलांनी माहिती दिली.

 

इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी राजेश टोपे गेले होते. अशावेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही.
मला खात्री आहे की टोपेंनी तशी चर्चा केलेली नसावी.
एखाद्याच्या घरी दु: खद प्रसंग घडला असताना अशाप्रकारची राजकीय चर्चा केली जाणं ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही,
असं पाटील (Jayant Patil) म्हणाले. (NCP Jayant Patil On AIMIM Alliance)

 

दरम्यान, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत (Aurangabad Municipal Election) एमआयएमची भूमिका काय राहते ते पाहावं लागेल. भाजपच्या पराभवासाठी की भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यास उत्सुक आहेत, स्पष्टपणे कळेल, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- NCP Jayant Patil On AIMIM Alliance | NCP Chief sharad pawar led ncp maharashtra chief jayant patil says aimim have to prove that they will to beat bjp in elections

 

हे देखील वाचा :

Alsi For Diabetes | ‘या’ पदार्थाचे सेवन केले तर Blood Sugar येईल कंट्रोलमध्ये; जाणून घ्या

Pooja Vastrakar Longest Six | पूजा वस्त्राकरने मारला यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब सिक्सर; पाहा व्हिडीओ

LIC Lapsed Policies | LIC च्या ‘या’ पॉलिसी होल्डर्ससाठी पुढील 7 दिवस महत्वाचे, होईल मोठा फायदा

 

Related Posts