IMPIMP

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

by nagesh
Nilesh Lanke | mla nilesh lanke hunger strike called off after ncp leader ajit pawar called union minister nitin gadkari

पारनेर : सरकारसत्ता ऑनलाइन  शिंदे सरकार (Shinde Government) अनधिकृत आहे. त्यामुळे हे सरकार अल्पकालीन आहे, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आघाडीवर आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी मोठा दावा केला आहे. पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे, असे निलेश लंके म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी हा वाद सुरु केला होता. सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस तळमळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे ते सत्तेत येण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना राज्यात पुढील पंधरा वर्षे तरी सत्ता मिळणार नाही, असे देसाई म्हणाले होते. तसेच आम्ही लोकशाही मार्गाने सरकार स्थापन केले आहे. आम्ही लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे लोकशाहीत बहुमताचा आदर व्हायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सत्तेत नाही, येवढीच त्यांची खंत असल्याची टीका देसाई यांनी केली होती.

 

शंभूराज देसाई यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
त्यामुळे पुढील सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच
असणार आहेत, असे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) म्हणाले.

 

यावेळी त्यांना अजित पवार (Ajit Pawar) की सुप्रिया सुळे (Supriya Sule) असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, एवढेच त्यांनी सांगितले.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवारातले सहकारी आहोत. परिवारातील ज्येष्ठाने एखादा निर्णय घेतला,
तर तो आम्हाला सर्वांना मान्य असतो, असे लंके यावेळी म्हाणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  NCP MLA Nilesh Lanke | ncp mla nilesh lanke said next cm from sharad pawar family ajit pawar or supriya sule

 

हे देखील वाचा :

Maharashtra Daura | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, ठाकरे गटाचे बालेकिल्ले निशाण्यावर

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Virat Kohli | जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी विराट सज्ज; 89 धावा करताच बनणार टी-20 चा ’किंग’

 

Related Posts