IMPIMP

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन    मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधला व विविध मुद्यांवर भाष्य केले. आमच्या डोळ्यात आजच्या प्रसंगी एकीकडे हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू देखील आहेत, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही दिवाळी आम्हाला कष्टदायी आहे. कारण आज आमचे खंदे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्यासोबत दिवाळी साजरी करायला नाहीत. त्यांना ज्याप्रकारे बळजबरी जेरबंद करण्यात आले, ते जनता पाहत आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) एवढ्या वर्षांत त्यांची आई पहिल्यांदा ओवाळू शकली नाही. आजच्या क्षणाला आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि एका डोळ्यात अश्रू आहेत. आमच्यासोबत गद्दारी करुन 40 आमदार गेले आणि त्यांनी आमचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला वाईट वाटत आहे. तर दुसरीकडे आम्हाला आनंद याचा आहे की, हे लोक गेल्याने आता तरुण रक्ताला आणि तरुणांना राजकारणात येण्याला वाव मिळेल. अनेक वर्षे हे लोक पक्क्या खुर्च्या करुन बसून राहिले होते. शिवसैनिक कुठेही हलला नाही. तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच आहे.

 

यावेळी किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) अजित पवारांचे देखील कौतुक केले. अजित पवार (Ajit Pawar) यांचे शब्द तडाखेबाज आहे. आणि त्यांचे काम देखील तडाखेबाज आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही दुमत नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.

 

तसेच विरोधकांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली होती.
आदित्य ठाकरे लायक नाहीत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या,
एका 30 – 32 वर्षांच्या मुलाला ते असे म्हणत असतील, तर त्याला आमचा दोष नाही.
ते लायक आहेत की नाहीत, हा त्यांच्या जीभेचा दोष आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना
पेडणेकर म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, कोवीडच्या अगोदर त्यांनी असे अनेक दौरे केले होते.
हा त्यांचा पक्षाचा दौरा आहे. कोवीड काळात दौरे झाले नाहीत. पण, आताचा दौरा आहे, तो सरकारी दौरा आहे.
आणि उशिरा का होईना ते आता गेले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Kishori Pednekar | Uddhav Thackeray went on tour sooner or later, Kishori Pednekar’s visit to Shinde-Fadnavis

 

हे देखील वाचा :

Virat Kohli | जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी विराट सज्ज; 89 धावा करताच बनणार टी-20 चा ’किंग’

Ayurvedic Remedies For Black Hair | केस काळे करण्यासाठी उपाय : केस पांढरे झाले आहेत का, मग अवलंबा ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

Nana Patole | नोटांवर लक्ष्मी-गणपतीचा फोटो छापण्याच्या केजरीवालांच्या मागणीवर नाना पटोले म्हणाले – ‘केंद्र आणि केजरीवाल मिळून…’

 

Related Posts