IMPIMP

Neena Gupta | नीना गुप्तांचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले कौतुक

by nagesh
Neena Gupta | actress neena gupta shared her new workout video netzines appreciate her

सरकारसत्ता ऑनलाईन – Neena Gupta | बधाई हो या चित्रपटातून लोकांच्या मनात पुन्हा एकदा स्वतःची जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे
नीना गुप्ता. त्यांनी त्यांच्या सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात केली आहे. नीना गुप्ता हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने वेळोवेळी जिंकतच असतात.
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘उंचाई’ चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती. सध्या नीना गुप्तांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल होताना दिसत आहे. (Neena Gupta)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नीना गुप्ताची बॉलिवूडमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळख आहे. अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. याही वयात त्या अनेक तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे काम करत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांचा एक वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या पुशअप्स हा वर्कआउटचा प्रकार करत आहेत, तर प्रशिक्षकाची मदत घेत ते हा व्यायाम करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले की, “नुकतीच सुरुवात केली आहे म्हणून शो ऑफ करत आहे”. (Neena Gupta)

 

 

सध्या नीना गुप्ता यांचा हा वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे,
तर अनेक नेटकरी कमेंट करून त्यांचे कौतुकदेखील करत आहेत. वाह, कमाल, टाळी वाजवणारे इमोजीस अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. नीना गुप्ताच काय आजकाल अनेक कलाकार आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरूक झालेले दिसत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Neena Gupta | actress neena gupta shared her new workout video netzines appreciate her

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Shruti Haasan | आजारपणातील फोटो शेअर करत अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली – ‘हा लुक देखील… ‘

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

 

Related Posts