IMPIMP

Omicron Variant in Maharashtra | ‘जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब वाढवणार’; मुलांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

by nagesh
Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope said retiring doctors do not have extensions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Omicron variant in Maharashtra | साऊथ आफ्रिका देशात आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाला धास्ती लागली आहे. काही दिवसांपुर्वी ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला. त्यानंतर महाराष्ट्रालाही (Omicron variant in Maharashtra) धडक दिली आहे. या ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारची चांगलीच धांदल उडाली आहे. ओमिक्रॉन या विषाणूमुळे आता महाराष्ट्र सरकार अलर्टवर आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) आणि टास्क फोर्समध्ये आज (सोमवारी) बैठक झाली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, ‘राज्यातील वाढती ओमिक्रोनची रूग्णसंख्या लक्षात घेता लहान मुलांच्या लसीकरण सुरू करण्याबाबत आणि बूस्टर डोसबाबत केंद्राकडे आग्रह धरणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तसेच जिनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) नागपूर आणि औरंगाबाद येथे नव्याने लॅबची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Omicron Variant in Maharashtra)

 

‘ओमिक्रॉनची वाढती संख्या पाहता राज्य सरकार आता केंद्राकडे (Central Government) बूस्टर डोसचा आग्रह करणार आहे.
सध्या राज्यात 3 जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब आहेत त्यामुळे या लॅब वेळीच वाढवण्याचा विचार आहे,
जेणेकरुन भविष्यात गडबड आणि तुटवडा निर्माण होऊ नये.
या लॅब नागपूर, औरंगाबादमध्ये होणार असल्याचीही त्यांनी सांगितलं.
तर राजकीय सभा, बैठकांमध्ये वाढती संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं.
त्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचं देखील राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Omicron Variant in Maharashtra | increase lab of genome sequencing lab what did rajesh tope say about vaccination of children in maharashtra

 

हे देखील वाचा :

EPFO | 7 लाखापर्यंत EDLI Scheme मध्ये मिळतो लाभ, जाणून घ्या कोण कसे करू शकतात क्लेम

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Nawab Malik | समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

 

Related Posts