IMPIMP

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

by nagesh
PAN- Aadhaar Link | pan aadhaar link how to check status of pan card and aadhaar card status know process

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPAN-Aadhaar Link | जर तुम्ही अजून तुमचे PAN Card आधारशी (Aadhaar) लिंक केले नसेल तुमच्यासाठी दिलासादायक बातमी असली (PAN-Aadhaar Link) तरी हिच बातमी तुमच्यासाठी थोडी नाराज करणारी सुद्धा आहे. कारण, मोदी सरकारने (Modi Government) या कामाची अंतिम तारीख एक वर्षासाठी वाढवली आहे, मात्र आता ही सेवा ’फुकट’ मिळणार नाही. या कामासाठी मोठी रक्कम भरावी लागणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), प्राप्तीकर विभागासाठी (Income Tax Department) सर्वोच्च धोरण बनवणार्‍या संस्थेने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख पूर्ण वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. (CBDT Income Tax Dept Extended PAN Aadhaar Link Last Date For One Year But No More Free Service)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली.
नोटिफिकेशनमध्ये असे लिहिले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे. (PAN-Aadhaar Link)

 

काम करत राहील PAN
CBDT च्या या नवीन व्यवस्थेनंतर ज्यांचे पॅन-कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केलेले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत राहतील.
अशा प्रकारे, प्राप्तीकर रिटर्न भरण्यापासून ते रिटर्न मिळवण्यापर्यंत, ते पूर्वीप्रमाणेच वापरले जाऊ शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मोफत सेवा संपली, भरा इतके पैसे
आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते.
मात्र आता ही ’मोफत सेवा’ बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत, जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान PAN-Aadhaar Link केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

 

Web Title :- PAN-Aadhaar Link | cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service

 

हे देखील वाचा :

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

Pune Crime | बिटकॉईनसाठी पैसे भरण्यास सांगून ते न देता 20 लाखांची तरुणाची केली फसवणूक; पुणे-मुंबई येथील 5 जणांविरूध्द गुन्हा

Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

 

Related Posts