IMPIMP

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागेना

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Anti Corruption interrogates Parambir Singh for 2 hours in Police Inspector Anup Dange reported the case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांंनी माजी गृहमंत्र्यावर आरोप केलेल्या शंभर कोटी रुपये लेटरबाॅम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्व घडामोडीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Minister Anil Deshmukh) यांंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) परमबीर सिंहांना अनेक वेळा समन्स बजावलं. मात्र, सिंह हे हजर झाले नाहीत. दरम्यान, परमबीर यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याची कबुली आज राज्य सरकारने (maharashtra Government) मुंबई हाय कार्टात दिली आहे.

परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा पत्ता लागत नसल्यामुळे यापुढे ॲट्रॉसिटी प्रकरणात (atrocity) त्यांना दिलासा देणार नाही, असं देखील राज्य सरकारने म्हटलं आहे.
त्याचबरोबर परमबीर यांच्याविरोधात ठाणे पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून आणि कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे.
अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी 4 महिन्यांपूर्वी कोर्टात दाखल केली आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्येक सुनावणीमध्ये सिंह यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, आता त्यांचा पत्ता कुठे आहे माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना संरक्षण देता येणार नाही.
असे विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा (Lawyer Darais Khambata) यांनी न्यायालयात म्हटलं आहे.
वकील खंबाटा यांनी न्या. नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) आणि न्या. सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांच्या खंडपीठाला आज सांगितले आहे.
याला परमबीर सिंह यांच्या वतीने ॲड. महेश जेठमलानी (Adv. Mahesh Jethmalani) यांनी विरोध केला.
दरम्यान, या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येणार आहे.
तसेच, परमबीर सिंह यांना अद्याप पोलिसांनी फरारी घोषित केलेले नाही.
पोलिसांनी आतापर्यंत दोनदा त्यांना समन्स बजावले होते आणि दोन्ही वेळेस त्यांनी उत्तर दाखल केले आहे.
अशी बाजू परमबीर यांच्या वतीने वकील महेश जेठमलानी यांनी मांडली आहे.

 

Web Title : Parambir Singh | mumbai former cp parambir singh mva government mumbai high court atrocity case police fir

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने अजूनही सर्वोच्च स्तरापासून 9697 रुपयांनी ‘स्वस्त’, पहा 1 तोळ्याचा नवीन दर

Pune News | ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्यातील चक्क 100 समाध्या चोरीला गेल्याची तक्रार

Jio-BP मुंबईच्या जवळ उघडणार पहिला Petrol Pump; 2025 पर्यंत 5,500 पेट्रोल पंप उघडण्याची योजना

 

Related Posts