IMPIMP

Amol Kolhe On Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन

by sachinsitapure

राजगुरूनगर : Amol Kolhe On Gas Cylinder Price | २०१४ ला गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले होते, गॅस सिलिंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारांना केले. खेड तालुक्यातील वाडा येथे प्रचार दौऱ्यात गावातील हरिनाम सप्ताहाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्त्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पदे येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिले. देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे.

जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो. त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

यावेळी अमोल कोल्हे यांच्यासोबत अमोल पवार, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, आबा धनवटे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, नीलेश कड, मयूर दौंडकर, राजमाला बुट्टे पाटील, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे, संजय घनवट आदी उपस्थित होते.

Jyoti Mete | पुण्यात ‘शिवसंग्राम’ची बैठक, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा, ज्योती मेटे यांनी स्पष्टच सांगितले…

Related Posts