IMPIMP

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Petrol Diesel Prices Increased In Pune | Petrol Diesel Fuel Prices Increased In Pune For Third Time In Four Days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Petrol Diesel Price Pune | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता सामान्य गृहिणींना दिलासा देत असतानाच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढ कायम ठेवली आहे. आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) करण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११४.९५ रुपये लिटर इतका झाला आहे. डिझेलमध्ये
आतापर्यंची एका दिवसातील सर्वाधिक ३९ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर १०४.४६ रुपये लिटर इतका आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११८.६५ रुपये लिटर इतका झाला आहे.

आतापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मात्र, या  ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेली दरवाढ ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये लिटर, डिझेलच्या दरात ८.५६ रुपये लिटर आणि पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.५० रुपये वाढ झाली आहे.

 

Web Title: Petrol Diesel Price Pune Today

 

हे देखील वाचा :

Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

 

Related Posts