IMPIMP

तुमच्याही PF Account मध्ये चुकीची असेल जन्मतारीख (DOB) तर तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्त, अन्यथा अडकतील सर्व पैसे

by nagesh
EPFO | pf contributions exceeding rs 2 5 lakh will be taxed 10 points

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PF Account | नोकरदार लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमच्या सुद्धा खात्यात जन्मतारीख (DOB), नाव किंवा पत्ता चुकीचा पडला असेल तर आता तुम्ही तो सहज दुरूस्त करू शकता. पीएफ खात्यात डिटेल्स बरोबर नसतील तर अनेक समस्या निर्माण होतात. पीएफचे (PF Account) पैसे अडकू शकतात.

असे अपडेट करा नाव, पत्ता आणि डेट ऑफ बर्थ –

3 वर्षापेक्षा कमी फरक असेल तर काय करावे?

जर तुमच्या ईपीएफ (EPF) रेकॉर्डमध्ये नोंदलेली जन्मतारीख आणि तुमची खरी जन्मतारीख यांच्यात 3 वर्षापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्ही आधार किंवा ई-आधारद्वारे (E-Aadhaar) ती दुरूस्त करू शकता. तुमचे आधार यासाठी EPFO च्या युनिफाईड मेंबर पोर्टलवर सबमिट करावे लागेल.

3 वर्षापेक्षा जास्त अंतर असेल तर काय करावे?

जर तुमच्या ईपीएफ रेकॉर्डमध्ये (PF Account) नोंदलेली जन्मतारीख आणि तुमची खरी जन्मतारीख यांच्यात 3 वर्षापेक्षा जास्त अंतर असेल तर आधार किंवा ई-आधारसह जन्मतारखेचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे सुद्धा युनिफाईड मेंबर पोर्टलवर सबमिट करावे लागेल.

जन्मतारखेचा पुरावा म्हणून यापैकी एक कागदपत्र आवश्यक –

  • पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ईएसआय कार्ड
  • केंद्र/राज्य सरकारच्या संघटनांच्या सर्व्हिस रेकॉर्डवर आधारित सर्टिफिकेट
  • शाळा/शिक्षणसंबंधीत एखादे सर्टिफिकेट
  • जन्म आणि मृत्युच्या रजिस्ट्रारकडून जारी बर्थ सर्टिफिकेट

कशी करू शकता ऑनलाइन रिक्वेस्ट –

  • ऑफिशियल लिंक https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जावे लागेल.
  • तुमचा यूएएन नंबर आणि कॅप्चा भरा.
  • आता साइन इन करा.
  • आता मॅनेज टॅबवर क्लिक करा.
  • यानंतर Modify Besic Detail वर क्लिक करा.
  • आता नवीन पेजवर चेंजेस रिक्वेस्टेड सेक्शनमध्ये योग्य जन्मतारीख टाका.
  • आता सेव्हा किंवा सबमिट किंवा अपडेटवर क्लिक करा.
  • जन्मतारीख दुरूस्त करण्याची रिक्वेस्ट टाकल्यानंतर हे करा.
  • एम्प्लॉयरला अपडेट मंजूर करण्यासाठी सांगा.
  • एम्प्लॉयर जेव्हा अपडेशनला मंजूरी देईल तेव्हा EPFO सुद्धा बदलाला मंजुरी सुद्धा देईल. (PF Account)

 

Web Title : pf account if you have wrong dob address and name in pf account rectify it soon by follow these steps

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Aryan Khan Drugs Case | ‘त्यांना’ फक्त आयर्नच्या अटकेत होता ‘रस’? NCB च्या SIT ला आढळून आल्या अनेक ‘त्रुटी’

Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्‍यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल 

Related Posts