IMPIMP

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल

by nagesh
ahmednagar hospital fire a nagar fire case filed against unknown persons in case of death due to negligence nashik police commissioner deepak pandey

 

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन –  अहमदनगर जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी आग (Ahmednagar Hospital Fire) लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत (Ahmednagar Hospital Fire) पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी सांगितलं.

आयुक्त पांडे म्हणाले, निष्काळजीपणामुळे मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात भादंवि कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलीस निरीक्षक (Police inspector) किंवा पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, राज्य सरकारकडून या अग्निकांडप्रकरणाच्या
चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.
ही अतिशय दुर्दैवी घटना असून सरकारनं वारंवार रुग्णालयांना फायर ऑडिट (Fire audit) करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे.

 

Web Title : ahmednagar hospital fire a nagar fire case filed against unknown persons in case of death due to negligence nashik police commissioner deepak pandey

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Global Air Quality Index | मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार 

Related Posts