IMPIMP

Pimpri Chinchwad Politics | अजित पवारांना धक्का, शहराध्यक्षांसह 16 माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट; विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

by sachinsitapure

पुणे : Pimpri Chinchwad Politics | मागील काही काळात राज्यात दोन पक्ष फुटले. त्यामध्ये शिवसेना पक्षात फूट पडून शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना असे दोन गट पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) असे दोन गट तयार झाले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणितं बदललेली आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून ठिकठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. (PCMC Politics)

एकेकाळी पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र याठिकाणी भोसरी आणि चिंचवड भागात भाजपाचे आमदार आहेत. तर पिंपरी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. म्हणजे पूर्णपणे महायुतीचे वर्चस्व पिंपरी चिंचवडमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र यंदा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून स्वतः लक्ष दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठी इन्कमिंग होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्षांसह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवारांची मोदी बागेत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी याअगोदर अजित पवारांची भेट घेऊन पुढील राजकारणासाठी शरद पवार यांच्याबरोबर जाणे योग्य असल्याची भूमिका मांडली. तुम्ही फार घाई करताय असं अजित पवारांनी सांगितल्या नंतरही या नेत्यांनी शरद पवारांची मोदीबागेत भेट घेतली. पिंपरी चिंचवड शहरातील अन्य नगरसेवकही तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे.

भोसरीची जागा भाजपला जाणार असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेकजण प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी शरद पवारांना भेटली. आगामी निवडणुकीसाठी गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनीच आता याबाबत पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे विलास लांडे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Related Posts