IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus Cases Today In India | corona havoc in india 1 lakh 79 thousand new cases surfaced in last 24 hours relief brought recovery

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण (New patient) संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 111 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 111 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 856 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 323 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या शहरामध्ये 827 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 15,811 जणांना लस

गुरुवारी (दि.30) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 15 हजार 811 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 19 लाख 50 हजार 070 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 111 new patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

NCP Prashant Jagtap | सिरिंजच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांवर ‘हल्लाबोल’

Maharashtra College Reopen | राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

Baramati Bus Stand | बारामतीत होणार राज्यातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक

 

Related Posts