IMPIMP

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | Diagnosis of 42 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 76 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 76 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 674 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 71 हजार 183 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 742 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

शहरामध्ये सध्या 742 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 16,215 जणांचे लसीकरण

 

शुक्रवारी (दि.22) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 16,215 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 22 लाख 21 हजार 725 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Comfortable! Discharge of 93 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात काकानेच केले भाचीसोबत अश्लिल चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Fixed Deposit | बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, होईल जास्त फायदा

 

Related Posts