IMPIMP

Fixed Deposit | बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, होईल जास्त फायदा

by nagesh
 Investment Tips | invest 2 to 5 lakh rupees in reit sgb index funds to get better returns than fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्था फिक्स्ड डिपॉझिटला (Fixed Deposit) मोठ्या कालावधीपासून पसंतीचा पर्याय मानले जात आहे. सामान्यपणे लोक आपली आर्थिक ध्येय जसे की घर बांधणे, कार खरेदी करणे, विवाह आणि उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करतात. याशिवाय, एफडीमध्ये गुंतवणुक (Fixed Deposit) केल्याने सेवानिवृत्तीची चांगली योजना बनवण्यास मदत होते. एफडी अकाऊंट (Bank FD account) उघडण्यापूर्वी गुंतवणुकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एफडी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :

1. किती काळासाठी घ्यायची आहे एफडी

एफडी (Fixed Deposit) करण्यापूर्वी टेन्चर ठरवणे आवश्यक आहे. कारण मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडल्यास दंड म्हणून काही रक्कम भरावी लागेल. शिवाय डिपॉझिटवर मिळणारा लाभसुद्धा कमी होईल. यासाठी ठरवा की किती काळासाठी पैसे गुंतवायचे आहेत.

2. एफडीचा कालावधी (FD Term Period)

गरजेनुसार एफडी बनवा. तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत आणि पुढील 5 ते 10 वर्षापर्यंत त्यांची गरज पडणार नसेल तर तेवढ्याच कालावधीसाठी एफडी करू शकता. एक वर्षाच्या तुलनेत 10 वर्षाच्या एफडीवर रिटर्न खुप जास्त होईल. आपला गरजेनुसार यथाशक्ती जास्त कालावधीसाठी एफडी (Fixed Deposit) करू शकता.

3. एफडीवर मिळणारे व्याज

हा एक सर्वात मोठा फॅक्टर आहे, ज्यावर सर्वांची नजर आहे. RBI वेळोवेळी व्याजदरात बदल करते. तेव्हा याचा परिणाम एफडीच्या व्याजदरावर सुद्धा पडतो. याशिवाय सर्व बँकांचे व्याजदर सुद्धा वेगवेगळे असतात. तेव्हा पैसे लावण्यापूर्वी हे सुद्धा तपासा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

4. कर्जाची सुविधा आहे किंवा नाही

एफडीवर ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळू शकते.
सोबतच एफडीवर कर्जसुद्धा मिळू शकते.
ओव्हरड्राफ्टची रक्कम एफडीच्या रक्कमेपेक्षा कमी असते, आणि यावर व्याज जास्त असते.
एफडीच्या (Fixed Deposit) रक्कमेच्या 90-95 टक्के भाग कर्ज म्हणून घेऊ शकता.

 

Web Title: Fixed Deposit | if you getting bank fd then definitely keep these 4 things in mind you will get more benefit

 

हे देखील वाचा :

Ananya Pandey Chat With Aryan Khan | आर्यन खानने अनन्या पांडेकडून मागवला होता गांजा? NCB सोर्सचा दावा, चॅटमध्ये लिहिले होते – ‘व्यवस्था करेन’

Pune Crime | ऑनलाईन रेडवाईन मागवणे पडले महागात, पुण्यातील डॉक्टरची 3 लाखांची फसवणूक

Rohit Pawar | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या ED चौकशीमागे कुणाचा हात?; पवारांनी केला गंभीर आरोप, म्हणाले…

 

Related Posts