IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 43 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 32 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 4411 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 125 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 963 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 387 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 387 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाची नोंद आज करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4506 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 7,129 जणांचे लसीकरण

सोमवार (दि.22) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 07 हजार 129 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 24 लाख 86 हजार 688 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 43 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ससून हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त

PM Kisan | अडकू शकतात 10 व्या हप्त्याचे 4000 रुपये ! जर झाली असेल ‘ही’ चूक, ‘या’ पध्दतीनं सुधारा, जाणून घ्या

Sania Mirza | सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांग्लादेश दौ-याहून रवाना

 

Related Posts