IMPIMP

Ravindra Dhangekar Sinhagad Road Rally | सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणार – रवींद्र धंगेकर

by sachinsitapure

पुणे : Ravindra Dhangekar Sinhagad Road Rally | सिंहगड रस्त्यावरील पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) येणारा भाग हा पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) येत असून, गेली अनेक वर्षे येथील नागरिक दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. उड्डाणपुलामुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी होणार असली, तरी इतर पर्यायी रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या प्रश्नांवर या भागात विद्यमान लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून, खासदार म्हणून निवडून आल्यावर या भागातील प्रलंबित प्रश्नांवर काम करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह रवींद्र धंगेकर यांनी विठ्ठलवाडी येथील मंदिरात आवर्जून दर्शन घेतले. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी, विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, आनंदनगर, साईनगर, खोराडवस्ती, साईनगर, तुकाईनगर, समर्थनगर, माणिकबाग, रामनगर, आपटे कॉलनी, धनलक्ष्मी, महालक्ष्मी सोसायटी या भागांत धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा व जीपयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेविका अश्विनी कदम, अभय छाजेड, आबा जगताप, चैतन्य पुरंदरे, बापू निंबाळकर, राजाभाऊ कदम,संतोष गोपाळ, अजय खुडे, महेश शिंदे, प्रसाद गिजरे, बाळासाहेब प्रताप, स्वराज गोसावी, रफिक शेख, राजू चव्हाण, लक्ष्मण रायकर, मिलिंद गवंडी, युवराज मदगे, विनोद देसाई, संदीप कडू, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धंगेकर यांचे या भागांतील नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी धंगेकर यांनी विविध गणेशोत्सव मंडळे, सोसायट्या आदी ठिकाणी वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या.

Ajit Pawar On Amol Kolhe | अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, म्हणाले, नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना

Related Posts